शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंदी काळातही अवैध मासेमारी करण्या-या मच्छीमारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 15:20 IST

शासनाने राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी हंगामात मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत.

उरण (मधुकर ठाकूर): उरण परिसरातील अनेक मच्छीमार बोटी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करीत आहेत.बंदी आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन केली आहे.

शासनाने राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी हंगामात मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. एक जुन ते ३१ जुलै या ६१ दिवसांचा मासेमारी बंदीचा कालावधी आहे.मात्र बंदी आदेश झुगारून उरण येथील करंजा, मोरा, रेवस, दिघोडा, केळवणे, जिते आदी गावातील शेकडो मच्छिमार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करीत आहेत.यामुळे मच्छीमारांचे अतोनात नुकसान होत आहे.स्थानिक परवाना महिला अधिकारी प्रियंका भोये कारवाईचा बडगा उगारीत आहेत. परंतु वरिष्ठ  पातळी वरुन त्यांना बळ देण्याची तसेच संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच अधिक कठोर कारवाई बाबत सक्षम कायदे करण्यात यावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन शनिवारी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन दिले आहे.

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी चर्चा केली.चर्चेअंती शासनाचे आदेश धुडकावून पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर 

मासेमारी करण्या-यांवर कुठलीही दयामाया न  दाखविता कठोर कारवाई करण्याचे आदेश मंत्र्यांनी सचिवामार्फत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच अवैध मासेमारी करणाऱ्या नौका, मालक, तांडेल, खलाशी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन किमान तीन वर्ष सजा, मोठ्या रक्कमेचा दंड, नौका जप्ती करुन संबंधीत कौल, मासेमारी परवाने रद्द करुन नौका कापून नष्ट करणे,संबंधीत मच्छीमारांची घरे जप्ती करण्याबाबत बील तयार करण्याचे आश्वासनही यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.

याप्रसंगी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, खजिनदार परशुराम मेहेर, पालघर महिला संघटक ज्योती मेहेर, मरोळ बाजार मच्छीमार संघटनेच्या अध्यक्षा राजश्री भानजी, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे उपाध्यक्ष प्रमोद आरेकर, भुवनेश्वर धनु, जयेश भोईर, प्रफुल्ल तांडेल,प्रवीण तांडेल, रवींद्र पांचाळ, गौरव पाटील, प्रतिभा भाटे आदी  उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडFishermanमच्छीमार