शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मागणीनुसार पार्थ यांना उमेदवारी दिल्याने जबाबदारी वाढली-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 04:07 IST

शेतकरी कामगार पक्षाने देशाचे राजकारण लक्षात घेऊन पवार कुटुंबातील उमेदवार मागितला आहे. शरद पवार यांनी पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उतरवून आपल्या पक्षावर मोठी जबाबदारी दिली आहे.

नेरळ - शेतकरी कामगार पक्षाने देशाचे राजकारण लक्षात घेऊन पवार कुटुंबातील उमेदवार मागितला आहे. शरद पवार यांनी पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उतरवून आपल्या पक्षावर मोठी जबाबदारी दिली आहे. मात्र आपले मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्षाची कर्जत आणि खालापूर तालुक्यात ताकद वाढली आहे हे मानायला तयार नाही असे प्रतिपादन शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी के ले.कर्जत येथील शेळके मंगल कार्यालयात शेतकरी कामगार पक्षाचे वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष-काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी संवाद सभा आयोजित केली होती, या वेळी पाटील बोलत होते. आम्हाला शिवसेनेला येथे वाढवायचे नसल्याने आम्ही मावळ आणि रायगड दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला दिले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी शिवसेनेला जवळ घेऊन निवडणूक लढतात म्हणून आज ही संवाद सभा घेण्याची वेळ आली. आमच्या कर्जत तालुक्यातील कार्यकत्यांना आम्ही आदिवासी म्हणून बोलतो, कारण ते गरीब आहेत; पण त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवली आहे हे सतत मान्य करतो. मात्र, आपण आमच्या सोबत पिढ्यान्निपढ्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सेनेला मदत करण्याचे धोरण राबविता हे चूक आहे असे सांगून, जयंत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या सरकारने देशावर ८२ लाख कोटीचे तर राज्य सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. तरीदेखील दुष्काळ असताना मदत होत नाही. त्यामुळे असले गरीबांना आणखी गरीब करणारे आणि हे सरकार पुन्हा नको म्हणून आमच्या आणि पाटील यांच्या स्नेहामुळे पाटील कुटुंबाच्या आग्रहामुळे पार्थ यांना उमेदवारी दिली आहे.या वेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmavalमावळ