शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराला मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:38 IST

पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अलिबाग : येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सोमवारी सकाळी पत्रकार भवन येथून हा मोर्चा निघाला. शिस्तबद्धपणे हा मोर्चा पोस्ट आॅफिस - काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा - न्यायालय - पोलीस ठाणे या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. हिराकोट तलाव येथे हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी हे निवेदन स्वीकारले.निवडणूक आयोगाची परवानगी नसताना मतमोजणी केंद्रात बेकायदा प्रवेश केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: गुन्हा दाखल करावा. मतमोजणी प्रक्रि या पूर्ण झालेली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून या प्रक्रि येत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करावी. आरोपपत्र तयार करून लवकरात लवकर न्यायालयात खटला दाखल करावा. पत्रकारावर हल्ला केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवावा. सीसीटीव्ही कव्हरेज फूटेज मिळावेत या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.