हापूस आंब्याच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:56 PM2019-05-21T22:56:52+5:302019-05-21T22:57:41+5:30

शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची बागायतदारांची मागणी

Decrease in the production of apricot mangoes | हापूस आंब्याच्या उत्पादनात घट

हापूस आंब्याच्या उत्पादनात घट

Next

अलिबाग : जिल्ह्यात चालू वर्षात उच्च तापमान, बदलते हवामान आणि अवेळी पडणारा पाऊ स अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याने, आंबा उत्पादक बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे शासकीय स्तरावर सर्वेक्षण होऊन नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून होत आहे.


आंब्याच्या उत्पादनाकरिता फवारणी, औषधे, मनुष्यबळ आदी सर्व खर्च मोठा होत असून, त्या प्रमाणात यंदा आंबा उत्पादन मिळालेले नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना ३५ ते ४० टक्के आंबा हाती लागला आहे. अशीच अवस्था राहिल्यास आंबा बागाईतदार भुईसपाट होईल. तो होऊ नये यासाठी शासनाने आंबा उत्पादकांना सहकार्य करावे, अशीही अपेक्षाही भुवनेश्वर येथील आंबा बागायतदार तथा कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थांचे संचालक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे. बदललेल्या हवामानामुळे तसेच वारंवार पडलेल्या थंडीमुळे या वर्षी आंब्याचा मोहर गर्भावस्थेत असताना कमी झाला. परिणामी, आंब्याची धारणा कमी झाल्याने उत्पादकता खाली आली. आंबा उत्पादन कमी असल्याने पर्यायाने त्यावर आधारित शेतमजूर, खोके बनवणारे, वाहतूक व्यवसायदार, यांच्यावर विपरित परिणाम झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

आंबा नुकसानाचा अहवाल शासनास पाठवणार
च्हवामानातील सततच्या बदलामुळे जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादनात यंदा सुमारे ६० टक्के घट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंबा उत्पादक शेतकºयांचे अल्प उत्पन्न वा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये त्याचबरोबर नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी, याकरिता कृषी विमा योजना शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकºयांनी हा पीक विमा घेतला आहे आणि ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळेल. दरम्यान, आंबानुकसानाबाबतचा अहवाल शासनास पाठविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली आहे.

Web Title: Decrease in the production of apricot mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.