शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

रेती लिलाव जाहीर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:40 IST

बांधकाम व्यवसायामध्ये ‘काळे सोने’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बेकायदा रेती उत्खननावर महसूल विभागाने वक्रदृष्टी केली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रेतीच्या चोरीमुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागायचे.

आविष्कार देसाई अलिबाग : बांधकाम व्यवसायामध्ये ‘काळे सोने’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बेकायदा रेती उत्खननावर महसूल विभागाने वक्रदृष्टी केली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रेतीच्या चोरीमुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागायचे. त्याला लगाम घालण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील रेतीचे लिलाव जाहीर करण्यात आले आहेत. या माध्यमातून तब्बल ३५ कोटी पाच लाख ४४ हजार ७७५ रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होण्याची महसूल विभागाला अपेक्षा आहे. यातील विशेष बाब म्हणजे रेतीच्या लिलावामुळे रेती माफियांची दुकाने बंद होणार असल्याने त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई परिसरातील रेती मोठ्या प्रमाणात नवी मुंबई, मुंबई, पुणे परिसरातील काही भागांतील विकासकामांसाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेती काही प्रमाणात रायगड, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी वापरली जाते. तिन्ही जिल्ह्यांतील त्यात विशेष करून रायगड पट्ट्यामधील रेतीची प्रत उत्कृष्ट असल्याने तेथील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून रेतीचे लिलाव झाले नव्हते, अथवा ज्या ज्या वेळी रेतीचे लिलाव जाहीर करण्यात आले. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. रेती माफियांनी संगनमतानेच लिलावाला वाटण्याच्या अक्षता लावल्याचे त्या वेळी बोलले जात होते. त्यामुळे बेकायदा रेती व्यवसायाला चांगलेच उधाण आले. बेकायदा रेती उत्खननामुळे दर वर्षी सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत होता. मात्र, रेती माफियांचे उखळ पांढरे होत होते. महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी यांच्या वरदहस्तामुळे हे शक्य होत असल्याची ओरड सातत्याने होत होती.यावर उपाय म्हणून कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील चार प्रमुख आणि आठ उपगटांचे लिलाव जाहीर केले आहेत. तिसºयांदा या विभागासाठी रेतीचा लिलाव पुकारण्यात आला आहे. १ फेब्रुवारी ते ३० जून २०१८ या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अधिकृतपणे यांत्रिक ड्रेझरने रेतीचा उपसा करता येणार आहे. रेतीच्या उपशामुळे बोटी, जहाज यांचा मार्ग सुकर होत असल्याने दरवर्षी नदी आणि खाडीतील गाळ (रेती) काढणे आवश्यक असते, असे रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.लिलाव प्रक्रियेमुळे सरकारच्या तिजोरीमध्ये ३५ कोटी पाच लाख ४४ हजार ७७५ रुपयांचा महसूल पडणार आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यांचा वाटा १८ कोटी ६८ लाख ८९ हजार १६७ आहे. रेती व्यावसायिकांनी अधिकृतपणे व्यवसाय करावा, यासाठीच सरकारने लिलाव प्रक्रिया अवलंबली आहे, त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.>सरकारला १८ कोटी ६८ लाख ८९ हजार १६७ रुपयांचा महसूलरायगड-रत्नागिरी हद्दीतील सावित्री नदी/बाणकोट खाडीतील दोन उपगटांच्या माध्यमातून एक लाख १७ हजार ३१९ ब्रास रेती मिळणार असल्याचा अहवाल मेरीटाइम बोर्डाने दिला आहे. त्या माध्यमातून सरकारला १८ कोटी ६८ लाख ८९ हजार १६७ रुपयांचा महसूल मिळणार आहे.रायगड-रत्नागिरी हद्दीतील सावित्री नदी/बाणकोट खाडीतील एका उपगटातून २१ हजार २०१ ब्रास रेतीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये तीन कोटी ३७ लाख ७३ हजार १९३ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग वाघोटण नदी / विजयदुर्ग खाडीतील तीन उपगटांमधून चार लाख २८ हजार १२७ ब्रास रेती मिळणार आहे. त्या माध्यमातून आठ कोटी ५३ लाख ९६ हजार ५४५ रुपयांचा महसूल उपलब्ध होणार आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग वाघोटण नदी / विजयदुर्ग खाडीतील दोन उपगटांमधून दोन लाख २२ हजार ८९७ ब्रास रेती मिळणार आहे. त्यातून चार कोटी ४४ लाख ८५ हजार ८७० रुपये हे सरकारला मिळणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड