शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत्यूचे प्रमाण ६४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:00 IST

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे (जुना) महामार्ग आणि गोवा राष्ट्रीय महामार्ग या तीनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघात आणि त्यातील अपघाती मृत्यू आणि जखमींचे प्रमाण ही चिंतेची समस्या गेल्या काही वर्षांपासून होती. गतवर्षी अपघाताचे प्रमाण ६८ टक्के होते. यंदा जिल्ह्यातील वाहन अपघात-मृत्यू प्रमाण कमी होऊन ६४ टक्क्यांवर आले असून चार टक्क्यांनी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात रायगड वाहतूक पोलिसांना यश आले आहे.जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात २०१३ मध्ये एकूण ७३७ वाहन अपघातात १७७ मृत्यू झाले होते. याच सहा महिन्यात २०१४ मध्ये ६७५ अपघातात १६० मृत्यू, २०१५ मध्ये ७२९ अपघातात १८६ मृत्यू, २०१६ मध्ये ६७९ अपघातात २०० मृत्यू तर चालू वर्षीत २०१७ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत ४७१ वाहन अपघातात १२८ मृत्यू असे अपघात व मृत्यू प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. यंदा २०१३ च्या तुलनेत हे प्रमाण ६४ टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. २०१४ मध्ये अपघाताचे प्रमाण ६९ टक्के, २०१५ ला ६४ टक्के तर २०१६ ला ६८ टक्के अपघाताचे प्रमाण आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१७ मध्ये अपघातांचे प्रमाण ४८ वर आले, परिणामी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होवून १४ वर आले आहे. जखमीं प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१३ मध्ये ५४ अपघातात १३ मृत्यू, २०१४ मध्ये ५८ अपघातात १२ मृत्यू, २०१५ मध्ये ६४ अपघातात २५ मृत्यू, २०१६ मध्ये ४९ अपघातात २३ मृत्यू तर चालू वर्षी याच कालावधीत २०१७ मध्ये ४१ वाहन अपघातामध्ये १६ मृत्यू असे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.अत्यंत धोकादायक आणि सातत्याने अपघात घडणारा महामार्ग म्हणून सर्वत्र चर्चेत राहिलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर याच सहा महिन्याच्या कालावधीत २०१३ मध्ये २७७ अपघातात ७५ मृत्यू, २०१४ मध्ये २६७ अपघातात ५३ मृत्यू, २०१५ मध्ये २४४ अपघातात ६२ मृत्यू, २०१६ मध्ये २८७ अपघातात ७९ मृत्यू तर याच सहा महिन्यांच्या कालावधीत २०१७ मध्ये १८६ अपघातात ३७ मृत्यू असे अपघात-मृत्यू प्रमाण कमी करण्यात विक्रमी यश आले आहे. अपघात प्रमाण कमी करण्याकरिता रायगड वाहतूक शाखेने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने अमलात आणल्याने हे यश साध्य करता आले आहे. यामध्ये जानेवारी ते १७ जुलै २०१७ या कालावधीत मद्यपी चालकांच्या विरुद्ध एकूण १ हजार ११९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करून एकूण ६६२ गुन्हे केवळ जून व जुलै या दोन महिन्यात दाखल करण्यात आले आहेत.जून २०१७ एका महिन्यात ५ हजार ३८ गुन्हे दाखल जून २०१७ या केवळ एका महिन्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे ६१, ओव्हर लोडिंगचे ०२, धोकादायक ओव्हरटेकचे ११६, जादा प्रवासी वाहतुकीचे १७५, लेन कटिंगचे ११, विना सिटबेल्टचे ४२९, विना टेल लाइटचे ०४, अनधिकृत नंबर प्लेटचे ०५, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे २२०, मद्यप्राशन करून गाडी चालविणे ३०१, विना हेल्मेट ५२७, गाडीला काळ््या काचा २५ असे विविध स्वरूपाचे ५ हजार ३८ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून विक्रमी तब्बल १५ लाख ११ हजार ५०० रुपये दंडवसुली करण्याची कामगिरी वाहतूक पोलिसांनी केली आहे.व्याख्याने घेऊन प्रबोधनरायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी महामार्गावरील समस्या अत्यंत गांभीर्याने विचारात घेवून रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे आणि त्यांच्या वाहतूक पोलीस पथकाबरोबर याबाबत संवाद साधला. रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात १५० व्याख्याने घेऊन संदर्भातील प्रबोधन के ले. ही मोहीममहत्त्वपूर्ण ठरली आहे.हेल्मेटचा वापर कराजिल्ह्यातील टोलनाक्यांवर मद्यपी चालक आणि विना हेल्मेट दुचाकी चालक यांच्यावरील कारवाईत एकूण १०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.