धोत्रेवाडीतील अंगणवाडीची दैना, अंगणवाडी भरतेय समाजमंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:26 AM2017-11-25T02:26:19+5:302017-11-25T02:26:30+5:30

कर्जत : तालुक्यातील धोत्रेवाडी येथील अंगणवाडी शाळेची इमारत नादुरुस्त असल्याने, सध्या अंगणवाडी समाजमंदिरात भरविली जात आहे.

Datrayewadi anganwadi dana, anganwadi filling society hall | धोत्रेवाडीतील अंगणवाडीची दैना, अंगणवाडी भरतेय समाजमंदिरात

धोत्रेवाडीतील अंगणवाडीची दैना, अंगणवाडी भरतेय समाजमंदिरात

Next

संजय गायकवाड
कर्जत : तालुक्यातील धोत्रेवाडी येथील अंगणवाडी शाळेची इमारत नादुरुस्त असल्याने, सध्या अंगणवाडी समाजमंदिरात भरविली जात आहे. पाच वर्षांपूर्वी दुरुस्त केलेली अंगणवाडी इमारत कधीही कोसळू शकते, अशा स्थितीत असून कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांच्या गावच्या असलेल्या इमारतीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमध्ये धोत्रेवाडी हे गाव असून, त्या ठिकाणी आदिवासी समाजाची वस्ती आहे. धोत्रेवाडी आणि बोरीची वाडी या आदिवासी वाडीमधील बालकांसाठी तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात अंगणवाडी इमारत आहे. २००५मध्ये बांधलेल्या अंगणवाडी शाळेची इमारत नादुरु स्त झाल्याने दोन्ही वाड्यांमधील ४५-५० बालके समाजमंदिरात भरविण्यात येत असलेल्या अंगणवाडीमध्ये येत असतात. इमारत नादुरु स्त झाल्याने कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून २०१२मध्ये इमारतीची दुरु स्ती करण्यात आली होती; परंतु छपरातून गळणारे पाणी, भिंतींना गेलेले तडे, मोडकळीस आलेले दरवाजे यामुळे त्या ठिकाणी लहान बालकांना तीन तास बसविणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी २०१६मध्ये अंगणवाडी शाळा भरविण्यासाठी समाजमंदिर उघडून दिले. दोन कुपोषित बालके असलेल्या या धोत्रेवाडी अंगणवाडी केंद्राची इमारत नव्याने उभारण्याची गरज आहे.
कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांचे धोत्रेवाडी हे गाव असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने अंगणवाडी इमारत हा महत्त्वाचा टप्पा बनला आहे. त्यातच अंगणवाडी समाजमंदिरात हलविण्यात आल्यानंतर शाळेच्या इमारतीची लाकडे, खिडक्या, पत्रे आदी साहित्य काढून नेण्यात आले आहे. आता केवळ त्या इमारतीचा सांगाडा शिल्लक राहिला असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद लक्ष देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेकडे अंगणवाड्यांच्या इमारती उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी असताना तालुक्यातील धोत्रेवाडी सारख्या अनेक अंगणवाड्यांच्या इमारती नादुरु स्त कशा राहतात? असा प्रश्न उपस्थित होतो.
>आमच्या विभागात जांभुळवाडी, सराईवाडी, जांबरूग येथील अंगणवाड्यांची अवस्था बिकट असून, कोणत्याही वेळी कोसळू शकते. दुसरीकडे धोत्रेवाडी येथील अंगणवाडी समाजमंदिरात भरविली जात असताना ठोंबरवाडीमधील अंगणवाडी इमारतीची अवस्था बिकट असल्याने घरात अंगणवाडी भरविली जाते, अशी चिंताजनक स्थिती आहे.
- जयवंती हिंदोळा, सदस्या, कर्जत पंचायत समिती.

Web Title: Datrayewadi anganwadi dana, anganwadi filling society hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड