शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

पेशवाई रस्त्यावरील पूल धोकादायक, नेरळमधील रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 23:42 IST

२०१६ मध्ये नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमधील दामत रेल्वे फाटक ते साई मंदिर असा रस्ता बनविण्यात आला होता. मातीचा भराव करून बनविण्यात आलेल्या रस्त्यात डांबरीकरण, तसेच दोन लहान पूलही बांधण्यात आले होते.

- कांता हाबळेनेरळ : नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमधून बांधण्यात आलेल्या रस्त्याची आणि पुलाची दयनीय स्थिती झाली आहे. रस्त्यावरील एका पुलाला एका बाजूला भगदाड पडले असून, दुसऱ्या पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील पूल कधीही कोसळू शकतो, तर डांबरी रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.२०१६ मध्ये नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमधील दामत रेल्वे फाटक ते साई मंदिर असा रस्ता बनविण्यात आला होता. मातीचा भराव करून बनविण्यात आलेल्या रस्त्यात डांबरीकरण, तसेच दोन लहान पूलही बांधण्यात आले होते. मात्र, त्यावेळी पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती आणि तेव्हापासून खड्डेमय रस्त्यातून वाहनचालक मार्ग काढत पुढे जात आहेत. कल्याण-कर्जत रस्त्याला दामत गावाच्या पुढे हा रस्ता कशेळे, कळंब भागाकडे जाण्यासाठी निघत असल्याने वाहनांची वाहतूकही चांगल्या प्रकारे असायची. त्याच वेळी माथेरान-नेरळ-कळंब या रस्त्याला हा पेशवाई रस्ता जोडला जात असल्याने, नेरळ गावात न जाता थेट कल्याण रस्त्याला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग बनला होता, परंतु त्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. मागील चार वर्षांत एकदाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही.त्यात या रस्त्यावरील दोन लहान पूल हे बनविल्यापासून कमकुवत होते आणि त्यामुळे त्या दोन्ही पुलांनी आता समस्या निर्माण केली आहे. त्यातील एका पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर बाहेर आल्या आहेत.पुलाची दुरु स्ती तातडीने करण्याची मागणी- पूल वाहतुकीस बंद केला, तरी त्या पुलाची दुरुस्तीबाबत नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरण अनेक वेळा तक्रारी करून, उपोषण करूनही काहीही बोलण्यास तयार नाही. ही बाब लक्षात घेता, पूल कोसळल्यास पेशवाई रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद होईल आणि नेरळ गावात न जाता परस्पर प्रवास करणाºयावाहनांसाठी प्राप्त असलेला पर्यायीमार्ग बंद होईल.त्यामुळे जबाबदारी घेऊन नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी धामोतेगावचे शिवसेनाशाखाप्रमुख दत्तात्रयविरले यांनी केली.खड्ड्यामध्ये साचले पाणीदामत गावाकडील पुलाला एका बाजूला भगदाड पडले असून, पुलावर साचून राहत असलेल्या पावसाच्यापाण्याने ते भगदाड कळूनयेत नाही.आमच्या विभागाशी संबंधित हा रस्ता नाही, परंतु रस्त्याच्या स्थितीबाबत तत्काळ नेरळ विकास प्राधिकरण यांना कळविणार आहे.- प्रल्हाद गोपणे,प्रभारी उपअभियंता,बांधकाम विभाग, जिल्हा परिषद