शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डान्सबारमुळे पुन्हा ‘चंगळ’वाद बळावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:30 IST

सत्ताधारी कात्रीत : विरोधकांची टीका

- आविष्कार देसाई

अलिबाग : डान्सबारवरील निर्बंध उठवण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात डान्सबारमुळे पुन्हा चंगळवाद बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर सत्ताधारी लोक प्रतिनिधींनी सरकारची बाजू उचलून धरली, तर विरोधकांनी मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच सर्वाेच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डान्सबारमुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक आया-बहिणींचे संसार उद्ध्वस्त झाले. तरुण पिढी बरबाद झाली. या विरोधात शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी सर्वप्रथम लक्ष्यवेधी उपस्थित करून त्या वेळी आघाडी सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी धाडसी निर्णय घेत सरसकट डान्सबारवर बंदी घातली होती. पाटील यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

पुढे याला कायद्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. भाजपा सरकारने वटहुकूम काढताना तो टिकणारा नव्हताच, हे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अधोरेखित केले होते. सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार जाणून बुजून कमी पडल्यानेच राज्यामध्ये डान्सबारला बळ मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुळात डान्सबार हे काँग्रेसचेच पाप आहे. हे विष राज्यामध्ये पसरू दिले जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. 

आघाडी सरकारच्या कालावधीत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने अनेक भगिणींच्या कपाळाचे कुंकू वाचवून उद्ध्वस्त होणारे संसार वाचवले होते. सर्वाेच्च न्यायालयात सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे.- सुनील तटकरे, आमदारडान्सबारचालक-मालक हे भाजपाचेच पदाधिकारी आहेत. त्यांना वाचवण्यासाठीच सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकारने जाणूनबुजून भूमिका घेतली आहे. राज्यातील जनतेला डान्सबार नको आहेत. जनतेच्या मनातील कौल विचारात घेऊन डान्सबार चालक-मालक यांनी स्वत:हून ते बंद करायला पाहिजेत.- विवेक पाटील, माजी आमदारकाँग्रेसने आणलेले डान्सबार रोखण्याचे काम सरकारने केले आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये नव्याने डान्सबार सुरू होणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने मानवतावादाची भूमिका घेतली. हे विष पुन्हा राज्याच्या मातीमध्ये पसरणार नाही, यासाठी प्रयत्न करू.

- प्रशांत ठाकूर, आमदारसर्वाेच्च न्यायालयाने काही निर्बंध शिथिल केले असले, तरी डान्सबार सुरू करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी आवश्यक आहे, त्यामुळे त्यांनी ती देऊ नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.- जयंत पाटील, आमदार, शेकाप सरचिटणीस

टॅग्स :danceनृत्य