शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 19:15 IST

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते

आविष्कार देसाईअलिबाग: काेकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी आज राेखला. अलिबाग तालुक्यातील नागाव आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांच्या राेषाला पथकाला सामाेरे जावे लागले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या नंतरच पुढे जा असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाल हाेता.

सकाळी 10 वाजता अलिबाग मांडवा जेट्टी येथे राेराे सेवेने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहणीसाठी निघाले. सुरुवातीला अलिबाग नागाव येथील पडझड झालेल्या एका खासगी शाळेची पाहणी केली. त्यानंतर चाैलकडे पथक जात असतानाच वाटेत विजेचे पाेल बसवण्याचे काम सुरु हाेते. ग्रामस्थांच्या मदतीने महावितरणचे काम करत हाेते. त्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला हाेता. केंद्रीय पथकाचा ताफा चालला आहे. रस्ता माेकळा करा असे पाेलिस अधिकाऱ्यांनी संबंधीतांना सांगितले. तेव्हा ग्रामस्थ नाराज झाले. गेले 15 दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही असे सांगत गाेंधळ घातला. त्यानंतर प्रांताधिकारी शारदा पाेवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर रस्ता माेकळा करण्यात आला. तसेच केंद्रीय पथक नुकसानग्रस्त नारळ सुपारीसह अन्य फळांच्या बागांची पहाणी न करता परस्पर निघुन जात हाेते. त्यावेळी नांदगावमधील बागायतदारांनी त्यांचा रस्ता राेखला आणि आपल्या व्यथा पथकासमाेर मांडल्या.

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते. नांदगावमधील केवळ बागायतींची पहाणी ते करणार होते. परंतु सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सदर पथकातील सदस्यांना नियोजित स्थळी वेळेत पोचता आले नाही. त्यामुळे आधीच वाट पाहून कंटाळलेल्या बागायतदारांना डावलून मुरुडकडे रवाना होणाऱ्या या पथकाला नांदगावच्या बागायतदारांनी रस्त्यातच राेखले आणि आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. रमाकांत खोत यांच्या बागायती जवळ नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे,पंकज दळवी विशाल चोरघे,श्रद्धा गद्रे,उदय खोत,सतिश देशपांडे,विलास ठोसर,रमेश चौलकर,सचिन खोत आदींनी पथकाच्या गाड्यांसमोर उभे राहून आपल्या नुकसानीचा पाढाच वाचला. कोकणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. सदर मदत तातडीने देण्यात यावी असेही त्यांनी या वेळी पथकातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर हे पथक श्रीवर्धनकडे रवाना झाले. 17 जूनला केंद्रीय पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करुन दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे. 18 जून राेजी दापाेलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून राे-राे सेवेने मुंबईला रवाना हाेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता ( संयुक्त सचिव) हे आहेत. त्याचबराेबर त्यांच्या पथकामध्ये बी.के.काैल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, उर्जा मंत्रालय नवी दिल्ली), एस.एस.माेदी (उपसचिव, ग्रामिण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषीमंत्रालय, नागपूर) आणि अनशूमाली श्रीवास्तव ( मुख्यअभियंता, रस्ते,वाहतुक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड