शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:11 IST

ठिकठिकाणी पंचनामे सुरू; मुंबई-ठाण्यासह नाशिक, पुण्यातही दणका

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाडे काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले आहेत.

चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील मोबाईल नेटवर्क बंद पडले होते, तर वीजप्रवाह पूर्ण बंद करण्यात आला होता. अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (५८) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असे दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच शेतातही पावसामुळे पाणी साचले.

या वादळाचा रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिकसह पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जिल्ह्यात ‘निसर्ग’चा प्रभाव कमी झाला असला तरी पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीत गेल्या २४ तासात सरासरी ९३.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, चिपळूण व मंडणगड या तालुक्यांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०८ मि.मी पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पेठ, नांदगाव वगळता उर्वरित १३ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. इगतपुरी, सिन्नरमार्गे पुढे मार्गस्थ झालेल्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा या दोन्ही तालुक्यांना बसला असून, सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झााली आहे. यामुळे ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेही नुकसान झाले.अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. पुणे जिल्ह्यात १६०० घरे, ५७ अंगणवाडी, ३१ शाळा आणि ४ ग्रामपंचायत इमारतींचे नुकसान झाले आहे. याशिवाय ४०२ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.१८,८८७नागरिक स्थलांतरितच्मुरुडला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईलाही फटका बसला. निसर्ग वादळामुळे वारा वाहत असताना, पाऊस पडत असताना ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १९६ ठिकाणी झाडे कोसळली. तर २० ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. यावेळी ३५ ठिकाणी तात्पुरते निवारे म्हणून महापालिकेच्या शाळा उघडण्यात आल्या.च्समुद्र किनारी राहत असलेल्या १८ हजार ८८७ नागरिकांना येथे स्थलांतरित करण्यात आले होते. आता या नागरिकांचे स्क्रिनिंग केल्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले जात आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ