शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

औषध विक्रेते अन् डाॅक्टरांमधील गाेरखधंद्याला लगाम, 'त्या' डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 19:23 IST

बाहेरुन औषध आणण्यास सांगणाऱ्या त्या डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश

आविष्कार देसाई

रायगड - जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र सरकारी रुग्णालयातील काही डाॅक्टर रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषधे आणण्यास सांगत आहेत. अशा डाॅक्टरांना त्वरीत निलंबीत करा असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले. त्यामुळे संबंधीत डाॅक्टर आणि औषध विक्रेता यांच्या गाेरखधंद्याला एक प्रकारे लगामच घातली जाणार आहे.

काेराेनाचा वाढता संसर्ग राेखण्यासाठी सरकारने माझे कुटूंब माझी जबाबदारी हि माेहीम 15 सप्टेंबर ते 15  ऑक्टाेबर 2020 या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुशंगाने पालकमंत्र्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  राजस्व सभागृहात आढावा घेतला. त्यानतंर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. जिल्ह्यात काेराेनाच्या विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. दर दिवसाला सातशेहून अधिक काेराेणा रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयांमधील बेडची क्षमता संपली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांना संबंधीत डाॅक्टरांकडून खासगी आैषधांच्या दुकानातून औषधे आणण्याचा सल्ला दिला जाताे. किमान तीन हजार रुपयांपर्यंतचा किंबहूना त्यापेक्षा अधिक आर्थिक भूर्दंड संबंधीत रुग्णाला साेसावा लागत आहे. परंतू सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसा आैषधांचा साठा शिल्लक असताना रुग्णांना नाहक त्रास दिला जात असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री तटकरे यांनी घेतली.

जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले जात आहेत. सर्व साेयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. असे असताना रुग्णांना नाहक त्रास हाेणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दमच पालकमंत्री तटकरे यांनी यंत्रणेला भरला. खासगी आैषध दुकानामधून आैषधे आणण्याचा आग्रह धरणाऱ्या संबंधीत डाॅक्टरांना तातडीने निलंबीत करा असे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. सुहास माने यांना दिले. सरकारी रुग्णालयातील काही डाॅक्टर आणि खासगी आैषध विक्रेते यांच्यात साट-लाेट असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून समाेर येत हाेत्या. पालकमंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने डाॅक्टर आणि आैषध विक्रेता यांच्यातील गाेरधधंद्याला लगाम घातली गेली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चाैधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.सुहास माने यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित हाेते.माझे कुटूंब माझी जबाबदारी या माेहिमेमुळे प्रत्येक घरातील नागरिकांच्या आराेग्याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आराेग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही तटकेर यांनी केले.सर्व्हेक्षणामुळे पुढील कालावधीत रुग्ण वाढण्याचा धाेका अधिक असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकार, प्रशासनाची आहे. मात्र काेणतही दुखण अंगावर काढू नका. डाॅक्टरांच्या सल्याप्रमाणेच उपचार घ्या असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील ऑक्सीजन आणि आयसीयु बेडची क्षमता वाढवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाढणारा आकडा लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये किमान तीन बेड हे काेराेनाची साैम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी आरक्षीत करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगडsunil tatkareसुनील तटकरेAditi Tatkareअदिती तटकरे