शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

फणसाड अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:46 IST

रानगव्यांची संख्या वाढली; पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत

संजय करडे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील सुपेगाव परिसरात सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य विस्तारले आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले फणसाड अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. सध्या या ठिकाणी रानगव्यांची संख्या वाढली असून पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. मात्र, त्यांचा स्थानिक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे रानगव्यांचे वावडुंगी, सुपेगाव, केळघर आदी भागात त्यांचे वास्तव्य दिसून येत असून, शेतात घुसल्यास संपूर्ण पिकाचा फडशा पाडत असल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

नवाब काळापासून फणसाड अभयारण्य क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध बसला आहे. अभयारण्यात साग व निलगिरीची झाडे असल्याने कडक उन्हातही इथले वातावरण थंड असते. या ठिकाणी ऐन, किंजळ, जांभूळ, हेड, कुडा, गेळ, अंजली, कांचन, सावर याचबरोबर सीता-अशोक, सर्पगंधा, रानतुळस, कुर्डू, कडीपत्ता, उक्षी या वनौषधीसुद्धा आढळून येतात.च्२५ फेब्रुवारी १९८६ रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हापासून येथे वृक्ष संपदा व वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठी दक्षता घेतली जात आहे. जगभरात सर्वात लांब वेलींमध्ये गणली जाणारी गारंबीची वेल तसेच विविधरंगी ९० प्रजातींची फुलपाखरे या ठिकाणी आढळून येतात. यात ब्ल्यू मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आढळून येतात.च्घुबड, तुरेवाला सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ असे १६४ प्रजातीचे रंगबिरंगी पक्षी येथे वास्तव्यास आहेत.फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीवांचा वावर आहे. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार)सुद्धा येथे आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी गिधाडेही मोठ्या संख्येने आढळतात.फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीवांचा वावर आहे. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार)सुद्धा येथे आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी गिधाडेही मोठ्या संख्येने आढळतात.