शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत गर्दी; कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 03:11 IST

सामाजिक अंतर राखण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न

कर्जत : तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरू आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापाऱ्यांनी २९ जून ते १ जुलै असे तीन दिवस कडकडीत बंद पाळला. मात्र, गुरुवार २ जुलै रोजी बाजारपेठ उघडल्यानंतर कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता; मात्र काही दिवसांनी कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आणि हळूहळू त्याने आपला पसारा वाढवला. लॉकडाऊन काढण्यात आल्यानंतर कर्जत शहराबरोबरच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. शहरालगतच्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी कर्जतच्या व्यापारी फेडरेशनने व्यापाऱ्यांची तातडीची सभा बोलावून तीन दिवस बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे; मात्र या बंदच्या वेळी केवळ वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू ठेवण्यात आली होती.

तीन दिवसांच्या बंदनंतर गुरुवार, २ जुलै रोजी बाजारपेठ उघडण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुख्य बाजारपेठेत दुचाकी, चार चाकी वाहने कशीही कुठेही उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडी झाली होती; तर नागरिकांची झालेली गर्दी पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाºयांनी गस्त घातली.पोलिसांचे पेट्रोलिंगकर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचाºयांनी बाजार पेठेत पेट्रोलिंग केले. गर्दी कमी करण्याच्या सूचना देऊन कुठेही कशीही वाहने उभी करणाºयांना समज दिली. तसेच सामानाची खरेदी करताना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन या वेळी पोलिसांनी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना के ले. दुकानदारांना नियम पाळण्याच्या सूचना के ल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस