शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पर्यटनस्थळांवर गर्दी : जिल्ह्यात दीड लाख वाहने दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:17 IST

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. भरीस भर म्हणून वीकेण्ड आणि नाताळ सणानिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे तब्बल दीड लाख जादा वाहने जिल्ह्यात दाखल झाली होती.आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या कामांमुळे जिल्ह्यात मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता होती. परंतु जिल्हा वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे यंदा कुठेही फारशी कोंडी न झाल्याने प्रवाशांसह पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांकडे धाव घेतली होती. पर्यटक खासगी वाहने घेऊन येत आहेत. २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत तब्बल दीड लाख वाहने रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे रायगडातील पर्यटन स्थळे फुलून गेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी सुमारे २७ टक्क्यांनी अधिक आहे.आतापर्यंत सुमारे सात लाख पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड जिल्हा औद्योगिकीकरणासाठीही ओळखला जात असल्याने अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत, त्यातच काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो.पाच दिवसांत ६७७ जणांवर कारवाईगेल्या पाच दिवसांमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाºया ६७७ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामध्ये तब्बल लाखभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नाताळातील पर्यटनाचा हंगाम संपला की लगेचच थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी होणाºया वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.२९, ३०, ३१ डिसेंबर २०१८ आणि १ जानेवारी २०१९ अशा चार दिवस पोलिसांना सलग काम करावे लागणार असल्याने पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरणार आहे.वाहतुकीवरील ताण वाढणार हे गृहीत धरूनच नियोजन करण्यात आले होते. वाहतूक विभागाचे ७६ कर्मचारी थंडी, वाºयाची पर्वा न करता वाहतूक नियंत्रित करीत होते. वाहतुकीमध्ये कोणताच अडथळा येऊ नये यासाठी चार फेज करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जिते-पेण- वडखळ या हेवी ट्रॅफिकच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुसरा फेज लोणरे ते माणगाव असा आहे. श्रीवर्धनहून पुण्याकडे जाणाºया वाहनांना हा फेज सोयीस्कर असा करण्यात आला आहे. तिसरा फेज खोपोली-शिळफाटा- पाली-वाकण आणि चौथा फेज हा अलिबाग-मुरुड असा होता. त्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या मोबाइल बाइक तैनात होत्या.- सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक विभाग

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई