शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुधागड दुय्यम निबंधक कार्यालयात तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 03:03 IST

कोरोना विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत.

पाली : संपूर्ण जगाला भयभीत करणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातील नागरिकांना बाधित करण्यास सुरुवात केली आहे. सर्व सरकारी यंत्रणा तसेच काही सामाजिक संघटनादेखील या विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत. सुधागड दुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवारी नागरिकांनी कामासाठी गर्दी के ली होती.शासनाचे महसूल गोळा करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय येथे रोज घरांचे, शेतजमिनीचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयात मात्र गर्दी कमी होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरदेखील रोज १० ते १५ दस्त नोंदविले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यालयांमध्येमुंबई, पुणे, ठाणे, कल्याण,पनेवल, डोंबिवली येथील अनेक नागरिक रोज दस्त नोंदणीसाठी येत आहेत.त्याचप्रमाणे दस्त नोंदणीसाठी देणार-घेणार, दुय्यम निबंधक यांचा अंगठा तसेच ओळख देणाºया व्यक्तींची बायोमेट्रिक नोंद म्हणजे अंगठा प्रमाणित करावा लागतो. त्यामुळे जर एखादा कोरोनाबाधित व्यक्ती येथे आला तर या अंगठा प्रमाणीकरणामुळे कोरोना संक्रमण होण्याचा मोठा धोका आहे.तसेच या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची सावधानता तसेच सॅनिटायझरची व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर कार्यवाही करून हे कार्यालय काही दिवसांसाठी बंद करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड