शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: कुटुंबातील २२ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नवघर गावातील वाळीत प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:23 IST

Crime News: पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

अलिबाग : पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. 

रायगड जिल्ह्यात गावामध्ये दोन गटात तंटा निर्माण झाला की एका गटाला वाळीत टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. आजही वाळीत टाकण्याचे प्रकार घडताना दिसतात. पेण तालुक्यातील नवघर गावात देवाच्या पालखी सोहळ्यात तंटा निर्माण झाला होता. यावेळी काही कारणास्तव देवेंद्र कोळी आणि त्याच्या चार कुटुंबांना गावाने वाळीत टाकले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या कुटुंबाबरोबर स्नेह संबंध तोडले होते. याबाबत वाळीत कुटुंबांनी प्रशासनाकडे अर्जही केली होती. प्रशासनाने दोन्ही गटात सुलाह करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र तो झालेला नव्हता. त्यानंतर पुन्हा पेण उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला होता. त्यानंतर चार महिने सर्व एकोप्याने राहत होते. मात्र पुन्हा ग्रामस्थांनी या कुटुंबांना वाळीत टाकले होते. त्यामुळे या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी आत्मदहनासाठी चार कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात  घेतले.

पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखलअलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या कुटुंबाला प्रबोधन करून आत्महत्येचा विचार डोक्यातून काढला. त्रास देणाऱ्याबाबत आपण लेखी तक्रार देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगितले. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड