शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटूंसाठी मातीचा आखाडा तयार करावा; पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 01:09 IST

अलिबाग येथील क्रीडा संकुलातील सोईसुविधांची पाहणी

रायगड : जिल्ह्यातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच त्यांचे नाव राज्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणे गरजेचे आहे. जिल्हा आणि राज्यस्तरीय कुस्तींच्या स्पर्धांसाठी आवश्यक असलेल्या निकषांप्रमाणे कुस्तीपटूंसाठी मातीचा आखाडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यामुळे ‌‘दंगल’ या हिंदी सिनेमाप्रमाणे मातीचा आखाडा आता जिल्हा क्रीडा संकुलात पाहायला मिळणार असल्याचे बोलले जाते. अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सोईसुविधांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीदरम्यान, त्यांनी खेळाडूंना व जनतेला आवश्यक असलेल्या क्रीडाविषयक देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. याशिवाय क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय सभागृह, वसतिगृहाची दुरुस्ती, संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव तत्काळ पाठवा, असे निर्देश दिले.

जिल्ह्यातील मल्लखांब आखाडे, जिल्हा व राज्यस्तरावरील कुस्तीच्या स्पर्धांसाठी आवश्यक निकषांप्रमाणे कुस्तीपटूंसाठी मातीचा आखाडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे, नव्याने ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक तयार करणे, शूटिंग रेंज उभारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यांसाठी तालुका क्रीडा संकुल उभारणी करण्यात येत आहे. त्याबाबतच्या कामाचा माहिती तटकरे यांनी घेतली.

माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. त्या कामाचाही आढावा त्यांनी घेतला. रेवस आणि मांडवा बंदराकडे परिवहन विभागाच्या एसटी बसेस जातात. या बसेस जिल्हा क्रीडा संकुलाच्या मार्गे नेण्यात याव्यात, असे परिवहन विभागाला विनंती पत्र लिहिण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सूचना केली. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, कार्यकारी अभियंता राहुल मोरे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये हौसेने खेळला जातो कुस्ती खेळ रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती खेळ हौसेने खेळला जातो. आतापर्यंत अनेक उदयोन्मुख खेळाडू दिले आहेत, क्रिडा, सामाजिक आणि राजकीय पाठबळ नेहमीच या खेळाला लाभले आहे. दरवर्षी गावपातळीपासून जिल्हा पातळीवर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, हा मातीतला खेळ आहे, आजही तो ग्रामीण भागातील गावागावात खेळला जात आहे, विशेष म्हणजे महिला ही खेळ खेळतात, अलिबाग येथील जिल्हा क्रिडा संकुलामध्ये मातीतील आखाडा निर्माण केला जाणार आहे. 

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे