शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये गांधी जयंतीनिमित्त माकपचे उपोषण; राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान बचावाची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 16:13 IST

नागरिकांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले. 

- मधुकर ठाकूर 

उरण : उरणमध्ये गांधी जयंतीच्या दिवशीच गांधी चौकात राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान वाचवा या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले. माकप आणि पुरोगामी व धर्मनिरपेक्ष संघटनांनी यासाठी उपोषण सोमवारी उपोषण केले. 

या उपोषणाच्या दरम्यान भारताची एकता व एकात्मता आणि  भारताचा गौरव कर्तव्य आणि अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी प्रतिज्ञाही म्हणण्यात आली. त्याचप्रमाणे भारताचे संविधान आणि त्याची उद्देशिकेचेही जाहीर वाचन करण्यात आले. तसेच याचा अभिमान बाळगून जनतेने सर्वधर्म समभाव व माणुसकी नात्याने देशाचा विकास करण्याचे व यातून नागरिकांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले.   या उपोषणात माकप,जनवादी महिला संघटना, डीआयएफआय,सीआयटीयु तसेच उरण मधील इतर संघटनानी पाठिंबा देत उपोषणात सहभाग घेतला. तर कम्युनिस्ट नेते व आदिवासीच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य बहाल करणारे कॉम्रेड कुमार शिराळकर यांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन केले. यावेळी माकपचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे, सिटु कामगार संघटनेचे भूषण पाटील, जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटील, कुंदा पाटील, किसान सभेचे संजय ठाकूर,डीवायएफआयचे राकेश म्हात्रे आदीजण उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड