शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दाम्पत्याने बांधला काँक्रीटचा बंधारा ; गावाच्या सुरक्षेसाठी मुलीचे लग्न ठेवले बाजूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:27 IST

अलिबाग आणि पेण तालुक्यांतील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांना उधाणाच्या भरतीने मोठी भगदाडे (खांडी) पडली आहेत. त्यामुळे हजारो एकर भात शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक झाली आहे.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग आणि पेण तालुक्यांतील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांना उधाणाच्या भरतीने मोठी भगदाडे (खांडी) पडली आहेत. त्यामुळे हजारो एकर भात शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक झाली आहे. फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीचे काम शासनाच्या खारभूमी विभागाने करायचे की बंधारे फुटीस कारण ठरलेल्या जवळच्या कारखान्याने करायचे याबाबत सध्या शासन स्तरावर केवळ चर्चेची गुºहाळे सुरू आहे. मात्र तब्बल १० वर्षांपूर्वी २००८ मध्ये अलिबाग तालुक्यातील शहापूर गावातील विनायक हरिभाऊ पाटील आणि मंदा विनायक पाटील या शिक्षक दाम्पत्याने मुलीचे लग्न बाजूला ठेवून गावाच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातून तब्बल १ लाख २५ हजार रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा संरक्षक बंधारा बांधून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला. मात्र त्यांच्या कार्याची आजतागायत सरकार दप्तरी कोठेही नोंद देखील नाही.पाटील दाम्पत्याने दहा वर्षांपूर्वी बांधलेला हा बंधारा संपूर्ण कोकणातील ‘सिमेंट काँक्रीट’चा पहिला बंधारा ठरला आहे. अशा प्रकारे खर्च करणे प्रत्येक शेतकºयाला वा सरकारलाही परवडणारे नाही. परंतु लाल माती वा मुरुम यांनी बंधारे बांधल्यास ते किमान १० वर्षे तरी टिकून उधाणापासून भातशेतीचे संरक्षण करू शकतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.शहापूर गावातील भंगार कोठा क्षेत्रातील सर्वे नं ८/२अ क्षेत्र ०-२४-० ही भातशेती विनायक पाटील यांच्या मालकीची आहे. गावकीच्या नियमाप्रमाणे त्यांच्या शेतजमिनीस लागून असलेल्या आठ फूट लांबीच्या संरक्षक बंधाºयाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी गावाने त्यांच्याकडे दिली होती. नेमका हा संरक्षक बंधारा धाकटे शहापूर गावाच्या समोर आहे. २००८ मध्ये उधाणाच्या भरतीने अनेकदा फुटला. परिणामी समोरील भातशेतीचे व गावालगतच्या रस्त्याचे मोठे नुकसान झाले. आपल्या खासगी मालकीच्या संरक्षक बंधाºयाच्या फुटण्यामुळे नुकसान होत असल्याचे पाटील यांना सारखे सलत होते. २००८ मध्ये त्यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच, अमावस्येला आलेल्या उधाणाच्या भरतीने संरक्षक बंधाºयाला भगदाड पडले आणि मोठे नुकसान झाले. त्यामुळे पाटीलयांनी मुलीचे लग्न बाजूला काँॅक्र ीटचा संरक्षक बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला.शहापूर गावचा मुख्य रस्ता ते भंगार कोठा येथील संरक्षक बंधाºयापर्यंत स्टील, डबर (दगड) सिमेंट व खडी असे सर्व साहित्य होडीने वाहून न्यावे लागले. ७५ पोती सिमेंट व १२ मिमीचे स्टील(लोखंडी सळ्या) देखील होडीतूनच वाहून नेले. पाटील दाम्पत्याच्या या निर्णयाला त्यांचे मित्र आत्माराम गोमा पाटील (रा. मोठे शहापूर) व भास्कर पाटील (रा. धाकटे शहापूर) यांनी नि:स्वार्थीपणे मदत केली. पाटील यांनी तीन होड्या १६ दिवसांकरिता भाड्याने घेतल्या होत्या. त्यापैकी भास्कर पाटील यांनी त्यांच्या होडीचे भाडे घेतले नव्हते असेही त्यांनी सांगीतले. १५ मजुरांनी भरपावसात १६ दिवस काम केले. अखेर २००८ मध्ये १ लाख २५ हजार रुपये खर्चातून ८ फूट लांब, १२ फूट रुंद आणि १५ फूट उंचीचा हा काँक्रीटचा बंधारा तयार झाल्याचे पाटील यांनी सांगितले.खारलँड विभागाकडून कौतुकखासगी मालकीच्या संरक्षक बंधाºयाच्या फुटीमुळे शेतकºयांचे व गावाचे नुकसान होऊ नये या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पाटील दाम्पत्याने संपूर्ण कोकणात सिमेंट काँक्र ीटचा पहिला संरक्षक बंधारा बांधला.तत्कालीन खारलँड विभागाचे उप विभागीय अधिकारी आर.के.बांदेकर यांनी या सिमेंट काँक्रीटच्या बंधाºयास भेट देवून पाटील दाम्पत्याचे कौतुक केले होते.गेल्या दोन महिन्यात शहापूर गावातील संरक्षक बंधाºयांना २५ ठिकाणी भगदाडे पडून भातशेती क्षेत्रात खारे पाणी घुसले आहेत. परंतु त्याच वेळी पाटील दाम्पत्याने बांधलेला हा सिमेंट काँक्रीटचा बंधारा मात्र सुरक्षित होता.

टॅग्स :Raigadरायगड