शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पुलांवरील लाखोंचा खर्च चौपदरीकरणामुळे वाया, शासनाच्या पैशाची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:43 IST

मुुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यासाठी भराव आणि छोट्या मोºयांची कामे प्रगतिपथावर आहेत. नवीन होणाºया मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये पूर्ण जुना रस्ता, रस्त्यावरील छोटे पूल, मोºया बाधित होणार आहेत. असे असताना राष्टÑीय महामार्ग विभागाने बाधित होणाºया पूल आणि मोºयांवर...

- सिकंदर अनवारेदासगाव -  मुुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यासाठी भराव आणि छोट्या मोºयांची कामे प्रगतिपथावर आहेत. नवीन होणाºया मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये पूर्ण जुना रस्ता, रस्त्यावरील छोटे पूल, मोºया बाधित होणार आहेत. असे असताना राष्टÑीय महामार्ग विभागाने बाधित होणाºया पूल आणि मोºयांवर तब्बल २७ लाखांची उधळण केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तीन आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक अशा चार छोट्या पुलांची दुरुस्तीची कामे सध्या केली जात आहेत. या कामांमुळे राष्टÑीय महामार्गाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे.महाड तालुक्यातील सावित्री पूल दुर्घटना २ आॅगस्ट २०१६ मध्ये घडली. या दुर्घटनेमध्ये तीन वाहने वाहून गेली तर ४७ प्रवाशांचा बळी गेला होता. या दुर्घटनेचा विचार करून शासनाने संपूर्ण महाराष्टÑातील महामार्गाच्या सर्व पुलांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. मात्र, या आॅडिटमध्ये महाराष्टÑातील अनेक पूल कमकुवत स्थितीत सापडले. अनेक ठिकाणची कामे करण्यात आली तर अनेक पूल आजही त्याच स्थितीत पाहावयास मिळत आहेत. सध्या मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाचे दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत बाधित होणाºया जुन्या राष्टÑीय महामार्गाच्या महाड तालुक्यातील एक, पोलादपूर तालुक्यातील दोन आणि रत्नागिरी हद्दीतील एक अशा रायगड आणि रत्नागिरीमधील तुटणाºया चार पुलांवर राष्टÑीय महामार्गच्या वतीने २७ लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला गेल्या तीन महिन्यांपासून सुरुवात झाली. असे असताना जानेवारीमध्ये निविदा काढण्यात आली. फेब्रुवारीमध्ये वर्कआॅर्डर काढून संजय डी. गायकवाड या ठेकेदार कंपनीने हे काम सुरू देखील केले आहे.नवीन रस्ते बांधणीच्या नियमाप्रमाणे जेव्हा एखादा रस्ता नवीन योजनेमध्ये समाविष्ट होतो त्यावेळेस संबंधित रस्त्यावरील जुन्या विभागाकडून होणारा खर्च बंद होतो. मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित असताना भूसंपादनाची शासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांना पैशाचे वाटप देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. पैसे वाटप झालेल्या गावांमध्ये जमीन नवीन रस्त्याच्या कामासाठी महामार्ग विभागाने ठेकेदार कंपनीला हस्तांतरित केले आहे. यामुळे आता राष्टÑीय महामार्ग विभागाच्या त्यावरील हक्क आणि काम करण्याची जबाबदारी देखील संपुष्टात आली आहे. असे असताना राष्टÑीय महामार्ग विभागाने चार छोट्या पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव कसा तयार केला त्या प्रस्तावाला तांत्रिक आणि आर्थिक मंजुरी कशी मिळाली हा संशोधनाचा भाग आहे.मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले खड्डे हा बहुचर्चित विषय आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी महामार्ग विभागाकडे निधी उपलब्ध नव्हता, मात्र बाधित होणाºया या छोट्या पुलांवरती लाखोंची उधळण करण्यासाठी पैसा कसा उपलब्ध झाला याची चौकशी करणे गरजेचे आहे.समन्वयाचा अभावबाधित होणाºया पुलावर दुरुस्तीचे काम याबाबत महामार्ग विभागाकडे चौकशी केली असता पेण येथील वरिष्ठ कार्यालयाने महाडच्या कनिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवत या कामाला कोणतीच मंजुरी मिळालेली नसून मंजुरीच्या अपेक्षेने तातडीच्या दुरुस्तीमधून हे काम केले जात असल्याच्या पेण येथील एका महिला अधिकाºयांनी सांगितले.तर महाड येथील कनिष्ठ कार्यालयाने रीतसर मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम केले जात असल्याचे सांगितले आहे. यामुळे महामार्ग विभागाच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ कार्यालयामधील समन्वयाचा अभाव दिसून येतो.दुरु स्ती के लेलेपूल वर्षभरात तोडणार?च्मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना जुना मुंबई-गोवा महामार्ग त्यावरील मोºया छोटे आणि मोठे पूल पूर्णपणे बाधित होणार आहेत. ठेकेदार कंपनीने पूल आणि मोºया उभारण्याचे काम देखील सुरू केले आहे. असे असताना दुरुस्तीवर खर्च काही प्रश्नांकित मुद्दा आहे.च्मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या पैशाचे वाटप झाले असून जमिनीचा ताबा देखील देण्यात आला आहे. अशावेळी धोकादायक पुलांच्या जागी पर्यायी रस्ता अगर मोºयांची उभारणी करून २७ लाखांची उधळण थांबवता आली असती. महाडमधील सावित्री दुर्घटनेचा आधार घेत भावनिक प्रस्ताव तयार करून २७ लाखांची मंजुरी आणण्यात आली. काम देखील सुरू झाले. आता जर दुरुस्ती केलेले पूल येत्या वर्षभरात तोडले जाणार असतील तर जनतेचे पैसे कु ठे गेले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दासगाव पुलाची डागडुजीच्मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्ग हा ब्रिटिशकालीन मार्ग आहे. दासगाव येथे महामार्गाच्या दुतर्फा असलेली लोकवस्ती आणि दासगाव खिंड येथील रस्त्याची उंची याचा विचार करून ब्रिटिशांनी दासगाव येथे छोट्याशा पुलाची उभारणी केली. वरील बाजूने महामार्ग आणि पुलाच्या खालून म्हणजेच भुयारी मार्गाने दासगाव बौद्धवाडी, कोंड तसेच मोहल्ला यांना दासगाव बंदर आणि ग्रा. पं. कार्यालय पेटकर आळी आणि भोईवाडा तसेच खाडी बंदराला जोडणारा मार्ग निर्माण केला.च्काही वर्षांपूर्वी दासगाव खिंडीचे रुंदीकरण करण्यात आले. यावेळी पुलाच्या रस्त्याचे देखील रुंदीकरण करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मागणी करून देखील या पुलाची दुरुस्ती अगर डागडुजी महामार्ग विभागाकडून कधी केली नाही. चौपदरीकरणाच्या कामात पूल तोडण्याची वेळ आल्यानंतर आताही पैशाची उधळण कशासाठीण असा प्रश्न उपस्थित के ला जात आहे.जानेवारीमध्ये निविदा मागवण्यात आली. फेब्रुवारीमध्ये वर्कआॅर्डर निघाली. महाड तालुक्यात एक पोलादपूर तालुक्यात दोन आणि रत्नागिरी हद्दीत एक असे चार पुलांचे जनाईटिंग (स्टील एक्स्पोज ओव्हरलेप) चे काम असून चार पुलांवर २७ लाखांचा खर्च टाकण्यात आला आहे.- अमोल माडकर, कनिष्ठ अभियंता, राष्टÑीय महामार्ग महाड विभाग

टॅग्स :highwayमहामार्गRaigadरायगड