शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी बेटावर आलेल्या लॉन्चेसच्या मालकांवर होणार कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:11 IST

भाजप पदाधिकारी असलेल्या मालकाच्या या तिन्ही लॉन्चेस असून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मुंबई मेरिटाइम व विभागाचे बंदर निरीक्षक संजय पिंपळे यांनी दिली.

उरण : लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून आणि संचारबंदीचे सर्वच आदेश धाब्यावर बसवून कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता घारापुरी बेटावर मंगळवार २१ एप्रिल रोजी दाखल झालेल्या तीन लॉन्चेसवर एकूण १२ खलाशी आहेत. या लॉन्चेस मेसर्स महेश टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या आहेत. भाजप पदाधिकारी असलेल्या मालकाच्या या तिन्ही लॉन्चेस असून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मुंबई मेरिटाइम व विभागाचे बंदर निरीक्षक संजय पिंपळे यांनी दिली.लॉकडाउनदरम्यान गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या शेकडो लॉन्चेस भाऊचा धक्का, दारुखाना येथील बंदरात मागील महिन्याभरापासून नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. निलकमल, राम अयोध्या, अष्टविनायक अशा तीन लॉन्चेस कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून घारापुरी बेटावर दाखल झाल्या आहेत. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून मंगळवारी अचानक दाखल झालेल्या या तीन लॉन्चेसमुळे बेटवासीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. जिल्हाबंदी आदेश मोडून आणि संचारबंदीचे सर्वच आदेश धाब्यावर बसवून बेटावर दाखल झालेल्या लॉन्चेसवरील खलाशांची तत्काळ आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बळीराम ठाकूर यांनी संबंधित शासकीय विभागाकडे याआधीच केली आहे. ग्रामपंचायतीच्या तक्रारीची दखल घेऊन मेसर्स महेश टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकावर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मुंबई मेरिटाइम व विभागाचे बंदर निरीक्षक संजय पिंपळे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या