शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: चाकरमान्यांच्या कुटुंबीयांचे गुरांच्या गोठ्या विलगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:43 IST

महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली.

- दीपक साळुंखेबिरवाडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा येथील चाकरमान्यांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतीमधील शहरातून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे विलगीकरण चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या कुटुंबीयांना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे नंबर १ येथील विलगीकरण कक्षामध्ये हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली. कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये एकूण २६ चाकरमानी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध शहरातून आपल्या मूळ गावी परतले असून, काहींना त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आले. तर काहींना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी महाड तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्यकेंद्रात करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोविड-१९ केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाड तालुक्यातील कोतुर्डे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक ज्ञानेश्वर आंभोरे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता विविध शहरातून दाखल झालेल्या चाकरमानी नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव विलगीकरण कक्ष तसेच त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, गुरांच्या गोठ्यामध्ये कुटुंबीयांचे विलगीकरण? या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. तर बिरवाडी राजिप कन्याशाळा येथील विलगीकरण कक्षामधील शौचालय नादुरुस्त असल्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांच्याजवळ संपर्क साधला असता शौचालय दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून नागरिकांची गैरसोय तत्काळ दूर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या- गोगावलेमहाड तालुक्यातील ग्रामीण भागात दाखल होणाऱ्या चाकरमानी कुटुंबीयांच्या व्यवस्थेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता गावांमध्ये दाखल होणाºया त्यांच्या निवासस्थानीच होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्यांच्या घरी जागेचा अभाव असेल अशा कुटुंबीयांकरिता शाळांमधून विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत.त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्याच्या कुटुंबीयांमार्फत करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असेदेखील गोगावले यांनी सूचित केले आहे.महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतीमधील शहरातून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे विलगीकरण चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या कुटुंबीयांना रायगड जिल्हा परिषद शाळा कातुर्डे नंबर १ येथील विलगीकरण कक्षांमध्ये हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पाणी जातेय वायामहाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना बिरवाडी कन्याशाळा येथील विलगीकरण कक्षातील पाणीपुरवठा करणारा नळ नादुरुस्त असल्याने रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे.महाडमधील २९५ शाळा अत्यावश्यक सेवेसाठी वापरणारमहाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ३१३ शाळांपैकी २९५ शाळा या अत्यावश्यक सेवेकरिता वापरात आणण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती महाड पंचायत समिती यांच्यामार्फत देण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या सात शाळा पूर्णपणे नादुरुस्त झाल्या आहेत. अवकाळी वादळी पावसामुळे नादुरुस्त झालेल्या शाळांमध्ये दासगाव मराठी, बिरवाडी २, कांबळे उर्दू, वाकी बुद्रुक, जुई येथील दोन शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड