शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Raigad: डिस्कव्हर हॉटेल बनले पोलिसांसाठी कोविड सेंटर; १२ जणांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:31 IST

लक्षणे दिसत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कर्जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी झाल्यापासून राज्यातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, तसेच खासगी हॉस्पिटलही शासनाने ताब्यात घेतली होती. त्यात शासनाच्या ताब्यात असलेल्या नेरळजवळील डिस्कव्हर हॉटेलचा समावेश होता. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस रुग्णांना आता या हॉटेलमध्ये ठेवून उपचार केले जात असून, त्या ठिकाणी १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण क्वारंटाइन केले आहेत, त्या सर्व रुग्णांचे केवळ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.जून महिन्यात कर्जत तालुक्यातील कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाने ग्रासले आहे. मागील काही दिवसांत सातत्याने पोलीस कर्मचारी कोरोनामुळे बाधित झाले आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबई, मरोळ येथील कोविड रुग्णालयात उपचार केले जात होते.

मात्र, मागील आठवड्यात नेरळ पोलीस ठाण्यातील तब्बल १२ पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील १० पोलिसांत कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती. ज्या रुग्णांत कोरोनाची लक्षणे दिसत होती, त्यांच्यावर अन्य मोठ्या रुग्णालयांत उपचार केले जात आहेत, परंतु कोणतीही लक्षणे नसलेल्या नेरळ पोलीस ठाण्यातील १० आणि कर्जत पोलीस ठाण्यातील दोन अशा १२ पोलिसांना नेरळजवळ असलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन करून आरोग्य विभागाने उपचार सुरू केले आहेत.

लक्षणे दिसत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी नेरळ पोलीस स्टेशनकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाबाधित पोलिसांवर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हॉटेलमध्ये नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सकाळ, संध्याकाळ तपासणी करीत आहेत. त्या ठिकाणी १२ पोलिसांसह अन्य दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस