शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कर्जत तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू, १० दिवस दिली मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 00:53 IST

पिंपळोली गावातील एक ४८ वर्षीय व्यक्ती ही वेगवेगळ्या व्याधींमुळे नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाली होती. हा रुग्ण शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीमध्ये ५ मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली.

कर्जत : तालुक्यातील पिंपळोली येथे एका ४८ वर्षीय व्यक्तीचे ११ मे रोजी ठाणे येथील रुग्णालयात निधन झाले. शरीरातील अन्य व्याधींवर १ मे पासून उपचार घेत असलेल्या त्या व्यक्तीला कोरोना झाला आणि त्या व्यक्तीचे रुग्णालयात निधन झाले. कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह चौथा रुग्ण असून वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त असताना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यामुळे त्याच्या जवळच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट घेतली जाणार आहे.पिंपळोली गावातील एक ४८ वर्षीय व्यक्ती ही वेगवेगळ्या व्याधींमुळे नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाली होती. हा रुग्ण शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीमध्ये ५ मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली. कोरोनाचा टेस्ट केल्यानंतर त्या रुग्णाला ७ मे रोजी कोरोना झाला असल्याचे निष्कर्ष निघाला. त्यामुळे कोरोनावर उपचार करण्यासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे ११ मे रोजी दुपारी निधन झाले. त्याानंतर नेरळ पोलीस ठाणे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पिंपळोली येथे पोहचले. येथील रुग्णाचे कुटुंबीय यांची माहिती घेण्याचे काम आरोग्य खात्याने सुरू केले. त्यांच्या टेस्ट घेऊन त्या पॉझिटिव्ह आल्या तर पिंपळोली गाव कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाऊ शकते. शासनाच्या नवीन आध्यादेशाप्रमाणे लगेच संबंधित रुग्णाचे गाव कंटेन्मेंट झोन करता येत नाही असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे पिंपळोली गाव सील करण्यात आले नाही. कोरोनामुळे रुग्णाच्या मृत्यूची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सी. के. मोरे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील आदी पिंपळोली गावात पोहचले होते.कर्जत तालुक्यातील चौथा कोरोना पॉझिटिव्हपिंपळोली येथील व्यक्तीचा ठाणे येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे. सर्वात आधी ठाणे येथून नेरळ येथून ये-जा करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता तर त्याच काळात मुंबईत वोकहार्ट रुग्णालयात नोकरी करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. ठाणे येथे टीसीएस कंपनीत दुचाकीवरून जाणारा कडाव जवळील एका गावातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता, या तिन्ही तरु णांनी कोरोनावर मात के ली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड