शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : माणगावमध्ये उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 23:50 IST

२० जून रोजी दुपारच्या सुमारास २४ वर्षीय तरुण रामजी काळू वाघमारे व त्याचा मित्र मनोहर नथू जाधव हे विळेकडून आंबिवलीकडे जात असताना, त्यांचा विळेजवळ अपघात झाला

गिरीश गोरेगावकर माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या तरुणाच्या नातेवाइकांना वारंवार १०८ क्रमांकावर कॉल करूनही तब्बल सहा तासांनंतर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे, अखेर अपघातात जखमी युवकाचा मृत्यू झाला. २० जून रोजी दुपारच्या सुमारास २४ वर्षीय तरुण रामजी काळू वाघमारे व त्याचा मित्र मनोहर नथू जाधव हे विळेकडून आंबिवलीकडे जात असताना, त्यांचा विळेजवळ अपघात झाला, यावेळी त्यांना विळे येथील सामजिक कार्यकर्ते नीलेश वांजळे यांनी एका मिनिडोर रिक्षाने उपजिल्हा रुग्णालयात माणगाव येथे दुपारी ४ वाजता दाखल केले. यावेळी रामजी वाघमारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच त्यांचा मित्र मनोहर याला किरकोळ मार लागल्याने, त्याला उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र, रामजीला दुखापत जास्त असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी न्यावे लागेल, असे सांगितले. मात्र, तेव्हा उपजिल्हा रुग्णालयाकडील रुग्णवाहिका ही कोविडकरिता राखीव ठेवल्यामुळे १०८ वरील इमर्जन्सी सेवेला संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फोन करण्यात आला; परंतु १०८ कडून तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी वांजळे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपघाती तरुण हा आदिवासी गरीब कुटुंबातील असल्याने, त्यांच्याकडे खासगी रुग्णवाहिका भाड्याने करून जाण्याकरिता पैसे नाहीत, आपण काही तरी मार्ग काढावा.तरीही रुग्णालयातून कोणतीच रुग्णवाहिका मिळत नसल्याने तब्बल सहा तास वारंवार १०८ ला फोन केला, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे पर्यवेक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनीही १०८ चे रायगड जिल्हा व्यवस्थापक किरण गायकवाड यांनाही त्यांच्या मोबाइलवर वारंवार फोन करून विनंती केली. मात्र, रात्री १२ च्या सुमारास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली. जखमी रामजी वाघमारे याला केवळ १५ किमी इंदापूर येथे नेल्यानंतर मृत्यूने गाठले. त्यामुळे ती रुग्णवाहिका माघारी आणली गेली. या दरम्यान जखमी युवकाला माणगाव रुग्णालयात दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते नीलेश वांजळे यांनी कर्तव्यावर असणारे डॉ.डोईफोडे व डॉ.जशी यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, रुग्णालय प्रशासनावर उपचारात निष्काळजी दाखविल्याचा गंभीर आरोप करत, रोष व्यक्त केला.>ढिसाळ कारभार : रायगड जिल्ह्यात एकूण १०८ सेवेच्या २३ रु ग्णवाहिका आहेत. त्यातील आठ रुग्णवाहिका कोविडसाठी राखीव ठेऊनही गंभीर जखमी रुग्णांकरिता सहा तासांनतंर इमर्जन्सी सेवा उपलब्ध होत असेल, तर १०८ बाबतचा ढिसाळ कारभार चाललाय, याकडे लक्ष देणे व याबाबत दोषी असणाºयांवर कारवाई झाली पाहिजे, असा आरोप मृतांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे.>माझ्या मुलाला रात्री रु ग्णवाहिकेमधून पाठविल्यावर माझ्या मुलाने प्राण सोडला. तोपर्यंत आम्हाला रुग्णालयातील डॉक्टर उडवाउडवीची उत्तर देत होते, असे रामजी वाघमारेच्या आईने सांगितले.>मी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो; परंतु आपण कोविडसह इतर कॉलवर रुग्णवाहिका असल्याने लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. माणगाव येथे असताना एक रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. याकरिता वेळ गेला, तरी लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.- किरण गायकवाड, रायगड जिल्हा व्यवस्थापक, १०८ सेवा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस