शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

CoronaVirus News: कोरोनाकाळात आश्रमांतील वृद्धांची माणूसभेटीसाठी घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:09 IST

आप्तांनीही पाठ फिरवलेल्या अनेक आश्रमांतील वृद्धांची अशीच माणूसभेटीसाठी घालमेल होत आहे, तर कोणताही निधी नसताना वृद्धाश्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाच्या जागतिक संकटाने तत्त्वज्ञानापासून ते सामान्य जीवन संघर्षाचे पैलू नव्याने पाहायला लावले. सोशल डिस्टन्सिंगमुळे बाहेरील व्यक्ती भेटत नसल्याने रोगापेक्षा उपाय भयंकर, असे म्हणण्याची वेळ आधीच विजनवासाचे चटके सोसत असलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांवर आली आहे. कोरोनाचे फंडे काहीही असो. आप्तांनीही पाठ फिरवलेल्या अनेक आश्रमांतील वृद्धांची अशीच माणूसभेटीसाठी घालमेल होत आहे, तर कोणताही निधी नसताना वृद्धाश्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात टाळेबंदी व संचारबंदी करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जग थांबले. काहींना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे रोजची देवाणघेवाणीची आर्थिक चेन तुटली. नागरिकांना आता संसार कसा चालवायचा, असा प्रश्न पडला होता. त्याचवेळी वृद्धाश्रम कसे चालवायचे, त्यामध्ये असलेल्या आजी-आजोबांचा कसा सांभाळ करायचा, असे विविध प्रश्न सतावत होते; मात्र अशावेळी आयुष्यभराची जमा केलेली ठेव मोडून वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे संगोपन केल्याचे वृद्धाश्रमचालक ॲड. जयेंद्र गुंजाळ यांनी सांगितले. आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढा देत असलेल्या ज्येष्ठांना या वयात धावपळ करणे शक्य होत नाही; मात्र आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कितीतरी वर्षांपूर्वीचे खटले आजही सुरूच असल्याने या सर्व गोष्टींमुळे त्यांना उतारवयातही मोठी दगदग सहन करावी लागते. यात त्यांना मोठा आर्थिक खर्चही सोसावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे खटले त्वरित निकाली काढावेत, असे ॲड. जयेंद्र गुंजाळ यांनी सांगितले. धकाधकीचे आयुष्य जगल्यानंतर उत्तरार्ध आनंदात आणि निवांत जावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. वाढत्या प्रदूषणाचाही त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांना फिरण्यासाठी निवांत जागा मिळावी यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे. वस्ती-वस्तीमध्ये विरंगुळा सेंटर असावेत, बगिचे असावेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाचा आधार नसतो त्यामुळे नाइलाजाने त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. त्यामुळे वृद्धाश्रमांचे रूपांतर आनंदाश्रमात व्हावे, याचाही विचार होण्याची गरज असल्याचे गुंजाळ म्हणाले.आपल्या समाजव्यवस्थेत नवीन काळाशी जुळवून घेण्यासाठी अजूनही कोणते नवीन कौटुंबिक किंवा कुटुंबाबाहेरील घटक यात आपण आणून संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला एक नावीन्याची जोड देऊ शकतो, याबाबत विचार, तशी मागणी, आपण आपल्याच समाजाकडून, सरकारकडून किंवा संपूर्ण व्यवस्थेकडून का करीत नाही, असा प्रश्न वृद्धाश्रम चालक ॲड. जयेंद्र गुंजाळ यांना पडला आहे.मुले आणि वृद्ध यांची काळजी, संगोपन हे स्त्रियांचे पारंपरिक कार्यक्षेत्र होते, मात्र आता गेल्या दोन ते तीन दशकांत स्त्रिया अर्थार्जन करून, कुटुंबाचा आर्थिक स्तंभ होऊ लागल्या आहेत. अशावेळी त्यांची पारंपरिक काळजी वाहकाची भूमिका बऱ्याच अंशी बदलली आहे. याची दखल, या पोकळीच्या अर्थकारणामुळे वृद्धांच्या बाबतीत संगोपन, देखभाल या साऱ्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था अजून अस्तित्वात आलेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या