शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

CoronaVirus News in Raigad : रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 23:32 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा लोंढा येत असल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे.

- आविष्कार देसाई।अलिबाग : जिल्ह्यामध्ये खोपोली वगळता अन्यत्र कोठेही शवदाहिनीची व्यवस्थाच नाही. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची हेळसांड होत असल्याने मृतांच्या नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेहाची विल्हेवाट लावणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग असल्याने जिल्हा प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी आहे.रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा लोंढा येत असल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईमधील रुग्णालयांची क्षमता संपल्याने आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातच उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अलिबागच्या सरकारी रुग्णालयामध्ये मंगळवारी दुपारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. मृताच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच अंत्यविधीला मृताचे शरीर कोणत्या वाहनातून न्यायचे, असा प्रश्न पडला होता. सरकारी रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उभ्या होत्या. मृताच्या नातेवाइकांनी तसेच मित्रांनी रुग्णवाहिका चालक-मालकांशी संपर्क साधला. मात्र, कोणीच मृतदेह नेण्यास तयार नव्हते. त्यामुळे बºयाच कालावधीपर्यंत मृतदेहासह नातेवाइकांना ताटकळत बसावे लागले होते. जिल्हा रुग्णालयाकडेही कसलीच व्यवस्था नसल्याने हाल झाले. काही कालावधीनंतर एक रुग्णवाहिका मिळाल्याने प्रश्न सुटला. नियमाने रुग्णवाहिकेतून मृतदेह नेता येत नाही, असे कारण सांगण्यात आले. मात्र, एरवी अशाच रुग्णवाहिकेतून मृतदेह नेल्याच्या घटना घडल्याचे कोणी नाकारू शकणार नाही.‘रुग्णालयांकडे शवदाहिनीची व्यवस्था नाही’- दीड महिन्यापूर्वी उरण आणि पेण येथील रुग्णांवर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला होता; परंतु कोरोनाच्या भीतीमुळेकोणीच पुढे येण्यास तयार नव्हते. त्यामुळे साध्या टेम्पो रिक्षातून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला होता. आता तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे संकट वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्हा सरकारी रुग्णालयांकडे शवदाहिनीची व्यवस्था नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. अलिबाग नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच शवदाहिनी घेण्यात येणार आहे.-प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबागरायगड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही वाहन तात्पुरत्या स्वरुपात शववाहिनीसाठी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या पुढे अशी अडचण येणार नाही.-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसalibaugअलिबाग