शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Raigad : रायगड जिल्ह्यातील ५८ ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:00 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत २३४ कोरोनाबाधित सापडले आहेत.

अलिबाग : मुंबई महानगराला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यामध्येही कोरोनाने सहज शिरकाव केला आहे. १५ मेपर्यंत रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४६१ वर पोहोचला होता. त्यामुळे तब्बल ५८ ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत २३४ कोरोनाबाधित सापडले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये ९३, उरण-१०८, श्रीवर्धन-५, कर्जत-४, पोलादपूर-२, खालापूर-३, महाड-४, अलिबाग-४ तळा, पेण, मुरुड आणि माणगाव प्रत्येकी-१ असे एकूण ४६१ कोरोनाबाधितांची संख्या आहे.ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही कोरोनाचा विळखा पडला आहे. ज्या विभागात कोरोनाचा संसर्ग झालेले आढळले आहेत, ती ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहेत.पनवेलमध्ये ४० क्षेत्र कोरोनाबाधितजिल्हाभरात १४ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून ५८ ठिकाणे ‘कोरोना विषाणू बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल तालुक्यातील ४० क्षेत्रांचा समावेश आहे.उरण तालुक्यामध्ये-६, अलिबाग आणि महाड प्रत्येकी-३, पेण, मुरुड, कर्जत, खालापूर आणि पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी-१ अशा कोरोनाबाधित क्षेत्रांचा समावेश असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड