शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

CoronaVirus News: गणेशोत्सवात कोरोनाचा धोका वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 12:05 AM

प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा झाल्या सज्ज

रायगड : पुढील आठवड्यात रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मुंबई-पुण्यातून दाखल होणार आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.कोकणामध्ये सर्वच सणांना विशेष महत्त्व दिले जाते. कोकणी माणसाचा सण साजरा करण्याचा उत्साह सर्वांचेच लक्ष वेधणारा असतो. परंपरागत पद्धतीने साजऱ्या करण्यात येणाºया गणेशोत्सवाचे वेगळेपण याच कारणांनी अधोरेखित होते. रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक हे मुंबई-पुण्यामध्ये कामधंद्यानिमित्त गेलेले आहेत. विविध सणासुदीला विशेषत: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ते हमखास आपापल्या मूळ गावी परतत असतात.सध्या कोरोना विषाणूचा कहर सर्वांनाच नकोसा झाला आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर एक प्रकारे गदाच आल्याचे दिसूनयेते. कोरोनाचा प्रादुर्भाव झालानाही, असा जिल्हा राहिलेला नाही. महानगरांकडून कोरोना आता ग्रामीण भागात चांगलाच विस्तारलेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीतहोणारी गर्दी विचारात घेता, रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी चाकरमानी आपापल्या गावी परतत असतात. मात्र, कोरोनामुळे सरकारने काही नियम आणि बंधणे घालून दिली आहेत. १२ आॅगस्टपर्यंत येणाऱ्यांसाठी सूट देण्यात आली होती, तर १२ आॅगस्टनंतर येणाºयांना स्वॅब टेस्ट बंधनकारक केली आहे. इ-पास काढताना कोरोनाचा स्वॅब टेस्टचा अहवाल सोबत जोडावा लागणार आहे. तो जर पॉझिटिव्ह असेल, तर संबंधिताला ई-पास मिळणारच नाही. त्यामुळे जिल्ह्यात किती संख्येने नागरिक येणार, याचा आकडा अद्यापही प्रशासनाला ठाऊक नसणे स्वाभाविकच आहे.२० हजार अँटिजेन टेस्ट किट्सची मागणीगणेशोत्सवाच्या कालावधीतील गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन अँटिजेन टेस्ट किट संबंधित आरोग्य यंत्रणांना दिले आहे. सरकारकडे २० हजार अँटिजेन टेस्ट किट्सची मागणी केली आहे. त्यातील काही किट्स लवकरच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना बाहेरून येणाºयांपासून जास्त धोका आहे. तसाच बाहेरील नागरिकांना जिल्ह्यातील नागरिकांपासूनही संसर्गाची भीती आहे, असेही डॉ.माने यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, असेही आवाहन त्यांनी केले.येणाºया नागरिकांची संख्या लक्षात घेऊन ग्रामपातळीवर अँटिजेन टेस्ट किट दिल्या आहेत. विशेषत: नगरपालिका प्रशासनाने आरोग्याच्या निधीतून अँटिजेन टेस्ट किटची खरेदी करावी. खोपोली नगरपालिकेन स्वत:ची अँटिजेन लॅब सुरू केली आहे. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील प्रयोगशाळा लवकरत कार्यान्वित होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या स्वॅब टेस्टचा आकडा वाढणार आहे.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगडकोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत साजरे करण्यात आलेले सण पाहिले, तर त्यामध्ये अजिबात धामधूम नव्हती, तसेच निसर्ग वादळामुळे आधीच चाकरमानी येऊन गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणाºयांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे ई-पास असेल, त्यांनाच जिल्ह्यात येता येणार आहे.- अनिल पारसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Mahotsavगणेशोत्सव