शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: करंजा येथे रुग्णांची कोविड चाचणी बंद, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:47 IST

लागोपाठ चार दिवसांत रुग्ण संख्येने शंभरी गाठल्याने करंजा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्हाधिकाºयांनी उरण रेड झोनमध्ये आल्याचे जाहीर केले.

उरण : तालुक्यातील करंजा परिसरात कोरोनाच्या प्रकोपामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. असे असताना गेल्या पाच दिवसांपासून करंजा येथील रुग्णांची कोविड- १९ ची चाचणी बंद करण्यात आल्याचे समोर आहे आहे. शासनाने क्वारंटाइन सेंटरची व्यवस्था करून टेस्टची सुविधा सुरू करावी, अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मार्तड नाखवा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीतून केली आहे.उरण तालुक्यात करंजा गावातील सातपाड्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. २० ते २२ दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. ५ मे रोजी एका संशयित रुग्णांची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तीन टप्प्यांत सुमारे १३८ संशयित रुग्णांची कोविड टेस्टमध्ये सलग चार दिवसांत ९६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.लागोपाठ चार दिवसांत रुग्ण संख्येने शंभरी गाठल्याने करंजा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्हाधिकाºयांनी उरण रेड झोनमध्ये आल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही शासकीय वरिष्ठ अधिकाºयांनी कोरोना टेस्ट करणेच बंद केले आहे. त्यामुळे परिसरातील १३८ गोरगरीब रुग्णांनी स्वखर्चाने कोविडची टेस्ट केली. केवळ पैशाअभावी अनेक संशयित रुग्ण कोविड-१९ची टेस्ट करू शकले नाहीत. तर काहींनी पैसे उधारीवर घेऊन कोविड टेस्ट करण्याच्या तयारीला लागले आहेत.कोविड-१९ टेस्टच्या सुविधा तत्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणीही नाखवा यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र, नाखवा यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी माहिती देताना सांगितले.कोविड टेस्ट बंद केलेल्या नसल्याचे सांगत गुरुवारी ६० संशयित रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी सोयीसुविधा असलेल्या उरण परिसरातीलच काही खासगी इमारती अधिग्रहण करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहितीही नवले यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड