शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

Coronavirus: परराज्यातील ६५ हजार जणांनी अ‍ॅपवर भरले ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 02:00 IST

अ‍ॅपला भरघोस प्रतिसाद : लॉकडाउनमुळे रायगड जिल्ह्यात अडकले नागरिक

अलिबाग : संचारबंदी व लॉकडाउनमुळे रायगड जिल्ह्यात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास ६५ हजार मजूर, नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या अ‍ॅपवर आपले आॅनलाइन अर्ज भरले आहेत. यातील १२०० मजुरांना घेऊन पहिली विशेष रेल्वे मंगळवारी मध्यप्रदेशातील रेवाकडे रवाना झाली.

लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यानुसार रायगडात अडकून पडलेल्या मजुरांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत. ३ मेपासून आतापर्यंत तब्बल ६५ हजार परराज्यातील मजुरांनी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या अ‍ॅपवरील लिंकवर आपले फॉर्म भरले आहेत.

लवकरात लवकर आपापल्या राज्यात स्वगृही जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी या मजुरांची मागणी आहे. अजूनही ठिकठिकाणच्या शासकीय रुग्णालयांबाहेर हजारोच्या संख्येने मजूर आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सकाळपासून रांगा लावून उभे आहेत. रायगड जिल्ह्याच्या विविध भागात परराज्यातील सुमारे दीड लाख मजूर असल्याची माहिती प्राप्त झाली. येथे कारखाने मोठ्या प्रमाणावर असल्याने परराज्यातील मुजरांची संख्यादेखील अधिक प्रमाणात आहे.परप्रांतीय मजुरांना लागली घराची ओघरायगड जिल्ह्यात पनवेल, नवी मुंबईत अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील १२०० मजूर, नागरिकांना विशेष रेल्वेने मध्यप्रदेशमध्ीाल रेवा येथे पाठविण्यात आले आहे. तब्बल ४२ दिवसांनी स्वत:च्या राज्यात, गावाकडे, घरी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. सुमारे दीड महिन्यानंतर या अडकलेल्या कामगारांना स्वत:च्या घरी जायची ओढ लागली आहे. आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अलिबाग जिल्हा रु ग्णालयात रांगा लावणाºया या कामगारांनी तोंडाला रु माल, मास्क बांधले असले, तरी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे दिसून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.परप्रांतीयांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा१) अलिबाग : जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारनंतर बुधवारीसुद्धा आरोग्य प्रमाणपत्रासाठी येणाºया परप्रांतीय कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात येत आहे. शेकडोंच्या संख्येने कामगारांच्या रुग्णालयात रांगा लागल्या आहेत. तोंडाला मास्क असले, तरी योग्य अंतर राखले जात नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले.२) लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय, परराज्यातील कामगारांना शासनाकडून त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याकरिता आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. याबाबतची माहिती समजताच परप्रांतीय कामगारांनी शासकीय रु ग्णालयाबाहेर मंगळवारपासून गर्दी करण्यास सुरु वात केली आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केली होती.३) रायगडमधील विविध कारखान्यांमध्ये ६० टक्के परप्रांतीय कामगार असून या सर्वांना आपल्या राज्यात जाण्याची घाई झाली आहे. कंपन्यांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड या राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर येथील मासेमारी नौकांवर ७५ टक्के कामगार परप्रांतीय कामगार आहेत. बांधकाम व्यवसाय, प्लंबिंग, वायरिंग आदी व्यवसायांमध्ये हे परप्रांतीय कामगार आहेत.४या कामगारांनी आॅनलाइन फॉर्म भरण्याकरिता तसेच स्वत:ची आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्याकरिता अलिबाग येथील जिल्हा रु ग्णालय, पेण, महाड, रोहा येथील उपजिल्हा रु ग्णालयात बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. रस्त्यावरून जातानाही हे कामगार घोळक्याने जात असल्याने, त्यांना पाहून नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस