शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकावर 4,856 प्रवाशांची केली तपासणी, २९ प्रवासी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:23 IST

Panvel coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत.

-  वैभव गायकरपनवेल : कोविडचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने वेळोवेळो विविध निर्बंध लागू केले आहेत. याचाच भाग म्हणून रेल्वे व रस्ते वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची कोविड टेस्ट करण्याचे राज्य शासनाने निश्चित केल्यानंतर संबंधित कोविड टेस्टला सुरुवात झाली आहे. याचसाठी पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत.दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा आदींसह लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान आलेल्या ६२ ट्रेनच्या प्रवाशांच्या तपासणीत सुमारे २९ प्रवासी  पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रुग्णांपैकी १६ प्रवाशांना पालिकेने स्थापन केलेल्या टियारा हॉल येथील कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित केले आहे. तर उर्वरित १३ प्रवाशांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. रेल्वे स्थानकांवर पालिकेचे दोन पथकांत प्रत्येकी चार असे एकूण आठ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, टेक्निशयन, फार्मासिस्ट आणि सिस्टरचा समावेश आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडpanvelपनवेल