शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

श्रीवर्धनमध्ये वाढला कोरोनाचा वेग, जनतेने सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 09:30 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात करोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. गेल्या चार महिन्यांत लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला.

श्रीवर्धन :  गेल्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर श्रीवर्धन तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना हद्दपार होतोय असे वाटत असतानाच अचानक गेल्या दोन दिवसांत श्रीवर्धनमधील बाधितांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली आहे.    गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात करोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. गेल्या चार महिन्यांत लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला.             धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, लग्नकार्य सर्वत्र सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला. लग्नसमारंभ, हळदी समारंभ येथे लोकांनी अवाजवी गर्दी केली. राजकीय सभा, संमेलन, ग्रामपंचायत निवडणुकीची धावपळ यात सर्वत्र कोरोनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्रीवर्धन शहर व ग्रामीण भागात बाधित रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात गेल्यावर्षी रुग्णांचे प्रमाण जास्त होते. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचारासाठी सर्व आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर, अत्याधुनिक रुग्णवाहिका व डॉक्टरांची टीम तयार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडून विविध ठिकाणी कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आजपर्यंत श्रीवर्धन तालुक्यात ४६१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जनतेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेतल्यास आगामी काळामध्ये श्रीवर्धनमधील परिस्थिती धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन केल्यास मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना पुन्हा एकदा उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. अंशतः सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ तालुका प्रशासनवर येऊ शकते. 

जनतेकडून कोरोनाकडे दुर्लक्षआम्हाला काहीच होत नाही, कोरोना झाला तर काय फरक पडतो ? आम्हाला लक्षणे नाहीत अशी विविध कारणे देत लोकांकडून राजरोसपणे नियमांचे उल्लंघन केले जाते. मास्क न वापरणे, जाणीवपूर्वक सोशल डिस्टन्सचा अवलंब करण्याय टाळाटाळ करणे, स्वतःची व इतरांची काळजी न घेणे अशा बाबी सर्रासपणे केल्या जात आहेत. चौकाचौकांत विनाकारण गर्दी केली जात आहे. हॉटेल, सार्वजनिक स्थळे या ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येते. मच्छी मार्केट, किराणा दुकाने कुठेही नियमांचे पालन केले जात नाही. खासगी व सार्वजनिक वाहतूक सर्वत्र सहजासहजी नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

श्रीवर्धनमध्ये जनतेने कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर , सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा जनतेने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.-सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धन

कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता सर्व जनतेने नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे .घराच्या बाहेर पडताना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याविषयी दृढनिश्चय करून निघावे.- समीर केळकर, रहिवासी, श्रीवर्धन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगडdocterडॉक्टरTahasildarतहसीलदारhospitalहॉस्पिटल