शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा विषाणू जिल्ह्यावर पडला भारी, आठ दिवसातच 168 रुग्ण मृत्यूच्या दाढेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 21:48 IST

पनवेल महापालिकेत सर्वाधिक मृत्यू

ठळक मुद्देकोरोनाचा विषाणू सध्या जिल्ह्यावर प्रचंड वेगाने आघात करत आहे. आतापर्यंत 96 हजार 126 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 82 हजार 92 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आविष्कार देसाई

रायगड - कोरोनाच्या विषाणूने जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल 168 रुग्णांचा गळा घोटला आहे. पैकी एकट्या पनवेल महापालिकेत 65 जण दगावले आहेत. दिवसाला बाराशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न ताेकडे पडत असल्याचे दिसून येते.

कोरोनाचा विषाणू सध्या जिल्ह्यावर प्रचंड वेगाने आघात करत आहे. आतापर्यंत 96 हजार 126 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 82 हजार 92 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दोन हजार 27 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. सदरची आकडेवारी ही 22 एप्रिल 21 पर्यंतची आहे.कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पुरती ढेपाळली आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच फरफट होत आहे. सध्या 12 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पैकी तब्बल नऊ हजार 101 रुग्णांवर घरातच उपचार केले जात आहेत.गेल्या 15 दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने पुढे सरकत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झाेप उडाली आहे. 

आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने जिल्ह्यात रुग्णाबाबत हेळसांड हाेत आहे. हे काही आता लपून राहीलेले नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल 168 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 15 एप्रिल रोजी 14 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 16 एप्रिल 14, 17 एप्रिल-19, 18 एप्रिल-15, 19 एप्रिल-25, 20 एप्रिल-20, 21 एप्रिल-19 आणि 22 एप्रिल रोजी 42 असे एकूण 168 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये एकट्या पनवेल महापालिकेमध्ये 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, कोरोना विषाणूचा होणारा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे, तसेच कोरोना लसीकरणही करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 11 हजार 555 जणांनी कोरोनीच लस टोचून घेतली आहे. त्यामध्ये फ्रंट लाईन वर्करची संख्या 29 हजार 266, तर आरोग्य सेवकांची संख्या  27 हजार 910 आहे. 45 ते 60 वयोगटातील 74 हजार 838 नागरिकांचा समावेश आहे. 60 वर्षाच्या पुढे लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 79 हजार 541 अशी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगडDeathमृत्यू