शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बुरुड व्यावसायिक हवालदिल,  तयार वस्तूंची विक्री न झाल्याने अडचण; आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:06 IST

कोरोनामुळे सर्व जगभर महामारीचे संकट घोंघावत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- अभय पाटील बोर्ली पंचतन : बांबूच्या काठीपासून विविध साहित्य तयार करणाऱ्या बुरुड व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. साहित्य तयार असून विक्री होऊ शकत नाही, वाहतूक बंद असल्यामुळे बांबू आणू शकत नाही, डोक्यावर कर्ज, कुटुंबाचा गाडा चालवायचा तरी कसा, यामुळे बुरुड व्यावसायिक पूर्णत: हतबल झाले आहेत. शासनाने लक्ष पुरवावे व आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी या व्यावसायिकांकडूनहोत आहे. कोरोनामुळे सर्व जगभर महामारीचे संकट घोंघावत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या टोपल्या, सूप आदी वस्तू तयार करणारा बुरुड समाज होय. जुन्या काळातील गावगाड्यातील हा समाज आहे. श्रीवर्धनमध्ये शेकडो घरे आहेत. आजही मूळ व्यवसाय करून हे आपले जीवन जगत आहे. आजही समाजातील ९० टक्के लोक हाच पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. दुसरा व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच आहे. या समाजातील अनेक लोक बांबू विक्रीचा व्यापार करतात. गेल्या काही वर्षांपासून बुरुड व्यवसाय टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहेत. त्यात प्लास्टिक सूप, टोपल्या आल्या आहेत. त्यात महिलांचा ओढा या वस्तूंकडे वाढला आहे. त्यामुळे हा व्यवसाय टिकविण्याचे आव्हान या समाजासमोर आहे.सध्या कोरोनामुळे आमच्या समाजाचा पारंपरिक व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. आमच्या समाजातील बहुतांश कुटुंबे हा व्यवसाय करत आहेत. सूप, टोपली, रोवळी, असे विविध साहित्य तयार असूनदेखील ग्राहक येणे बंद आहे सद्य:स्थितीला आमच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आमच्या व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी. - संजय नागे, अध्यक्ष, बुरुड समाज, बोर्ली पंचतनव्यवसायावरच चालतो कुटुंबाचा चरितार्थफेरी करून व्यवसाय चालू होता. ग्राहक त्यांना आवश्यक असणाºया वस्तू आणण्यासाठी येत होते; परंतु लॉकडाउनमुळे फेरी बंद व कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने ग्राहक फिरकेना, लग्नसोहळे रद्द झाले, बांबू आणण्यासाठी गाड्या बंद, तयार असेलेले साहित्य तसेच धूळखात पडून त्यामुळे हातावर पोट असणाºया या बुरुड व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावे, हा प्रश्न आहे.या समाजातील निराधार महिला देखील आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हा व्यवसाय करतात. या कोरोनामुळे एक वेळची भाकरी मुलांना कशी द्यावी हा प्रश्न भेडसावत आहे. शासनाने शेतकºयांना मदत जाहीर केली आहे यामध्ये बुरुड व्यावसायिकांनाही आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाRaigadरायगड