शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस बनले मेकॅनिक; प्रवास निर्विघ्न; गणेशोत्सव काळात रायगड पोलिसांनी चाकरमान्यांची कोंडीतून केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 07:12 IST

चोख नियोजन केले होते.बंदोबस्तासह सुविधा केंद्रे उभारली होती. गणेशोत्सवात त्यांनी गणेशभक्तांना अहाेरात्र सेवा दिली.

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी अहाेरात्र पहारा दिला. वेळप्रसंगी त्यांनी बंद पडलेल्या वाहनांचीही दुरुस्ती केली.

या काळात शंभर वाहनांची दुरुस्ती किंवा त्यांची स्टेपनी बदलण्याचे काम पोलिसांनी केले. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा प्रवास विनाअडथळा निर्विघ्न होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला होता. त्यासाठी चोख नियोजन केले होते.बंदोबस्तासह सुविधा केंद्रे उभारली होती. गणेशोत्सवात त्यांनी गणेशभक्तांना अहाेरात्र सेवा दिली.

१५ दिवसांपासून तत्पर  पेण ते महाडदरम्यानच्या रस्त्यात होणाऱ्या पंक्चर गाड्यांना तत्काळ स्टेपनी बदलण्यासाठी स्वत: पोलिस कर्मचारी वाहनचालकाला मदत करीत होते. तर काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीच्या सहाय्याने बंद पडलेल्या चारचाकी, तीनचाकीसह दुचाकीचे काम केले. मागील १५ दिवसांपासून रायगड पोलिसांनी चांगली सुविधा दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

बंदोबस्तासाठी असताना गणेशभक्तांची वाहने पंक्चर होत होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. ती टाळण्यासाठी आम्ही स्वत: मेकॅनिक बनून स्टेपनी बदलण्याची कामे केली. त्यामुळे गणेशभक्त  देत असलेले आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे होते.

- राजेंद्र गाणार, हवालदार

गणेशोत्सावादरम्यान काही पोलिस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतींचे दर्शनही घेता आले नाही. मात्र, नागरिकांची सेवा करणे, हाच गणेशाचा मोठा आशीर्वाद

असल्याचे सांगत होते. स्वत: एक अधिकारी म्हणून जेव्हा भक्तांची मदत करीत असतानाच आम्हाला मदत केलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंदात बाप्पाचे दर्शन होत होते.

- सोमनाथ लांडे, वाहतूक पोलिस निरीक्षक

भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी गणेशोत्सवापूर्वीच संपूर्ण नियोजन केले होते. या नियोजनासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रोल महत्त्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी आपल्या ड्यूटीव्यतिरिक्त गणेशभक्तांना केलेली मदत वाखाणण्याजोगी आहे. तर परतणाऱ्या गणेशभक्तींनी ही पोलिसांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

       - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस