शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

पेण मतदारसंघातील मतदान विजयासाठी निर्णायक; युती, आघाडीला करावे लागणार परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:55 IST

लोकसभा निवडणुका जाहीर होताच पेण, पाली-सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघात उत्साही वातावरण दिसते आहे.

- दत्ता म्हात्रेपेण : लोकसभा निवडणुका जाहीर होताच पेण, पाली-सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघात उत्साही वातावरण दिसते आहे. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदारसंख्या असलेला पेण विधानसभा मतदारसंघ आहे. येथील मतदारांचे मतदान विजयात नेहमीच निर्णायक ठरत असल्यामुळे युती विरुद्ध आघाडीच्या उमेदवारांना पेण विधानसभा मतदार संघातील मते आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. यामध्ये युतीचे अनंत गीते व आघाडीचे सुनील तटकरे या दोन आजी-माजी मंत्र्यांचा कस लागणार आहे, त्यात कोण बाजी मारतो हे येणाऱ्या सत्तर दिवसांच्या कालावधीत स्पष्ट होणार आहे.रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची थेट लढत होणार हे जगजाहीर झाले आहे. त्या अनुषंगाने युती व आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत ताकदीने उतरले आहेत. सद्यस्थितीत दोन्ही गटाकडून क्रीडा स्पर्धा, पक्षप्रवेश व आपल्या पक्षासह, मित्रपक्ष व विरोधी पक्षातील कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेण्याचा एककलमी कार्यक्रम जोशात सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पेण मतदारसंघात मोदी लाटेच्या परिणामस्वरूप तरुणाईचा कल शिवसेनेचे अनंत गीते यांना मिळाला. ६९ हजार मताधिक्य घेत त्यांनी सुनील तटकरेंवर नऊ हजारांची आघाडी मिळविली होती. तटकरे यांना ६१,९६८ मते मिळाली होती. त्या आघाडीच्या आधारावरच अनंत गीते यांचा अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला होता. परंतु पेणकरांना अनंत गीते यांच्याकडून या विजयाचे असे कोणतेही अनोखे गिफ्ट मिळालेले नाही. याबाबत गीतेंवर मतदारांची नाराजी आहे.पेण मतदारसंघात ३ लाख मतदारसंख्या असून १ जानेवारी २०१९ पर्यंत २ लाख ९८ हजार ६६ मतदार असल्याचे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये नोंद झालेली आहे. दरम्यान, अजूनही मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू असल्याने ही संख्या ३ लाखांच्या आसपास जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.युती, आघाड्यांचे पक्षीय बलाबलशिवसेना-भाजपा युतीमध्ये उत्साहाचे वातावरण म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा भाजपाप्रवेश. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील तटक रेंचा प्रचार करण्यात रविशेठ पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे तटकरेंना मोठे समर्थन मिळाले. परिणामी ६४,००० मते त्यांनी तटकरेंना पेण मतदारसंघातून मिळवून दिली होती. तेच रविशेठ पाटील तटकरेंविरोधात दंड थोपटत भाजपामध्ये गेल्याने अनंत गीते यांना मोठी जमेची बाजू मिळाली आहे. दुसरीकडे गतवेळच्या निवडणुकीत शेकापने तटकरेंविरोधात उमेदवार उभा केल्याने पेणमध्ये ३५,००० मतांचा फटका तटकरेंना बसला. आता राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून शेकाप-राष्टÑवादी आघाडीची गळाभेट तटकरेंसाठी मोठी जमेची बाजू आहे. शेकाप आ. धैर्यशील पाटील यांना विधानसभा निवडणुकीत ६९ हजार मते मिळाली असून त्यांचा आधार ही तटकरेंसाठी मोठी भूमिका ठरणार आहे. एकंदर राजकीय बेरजेत युती आघाडी समतोल असून येणाऱ्या काळात राजकीय प्रचारानुसार राजक ीय वातावरण निर्मितीनुसार मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी गीते - तटकरेंना बरेच परिश्रम घ्यावे लागतील. पेण क ाँग्रेस नेतृत्व भाजपात गेल्याने, समर्थ नेतृत्व देणारा नेता काँग्रेसकडे नाही. दुसºया फळीतील कार्यकर्ते काँग्रेस पक्षाची मते तटकरेंना कशी मिळवून देतात हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यास तटकरेंना कसरत करावी लागणार आहे.मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नपेण मतदारसंघामध्ये पेण अर्बन बँक ठेवीदारांचा प्रश्न आठ वर्षे प्रलंबित आहे. बँकेच्या जप्त मालमत्तांचे लिलाव व त्यातून मिळणाºया पैशातून ठेवी परत करणे हा सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक प्रश्न आहे.खारेपाटातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, ३० कोटी पाणीपुरवठा योजनेचे काम कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे महिला मतदारांची नाराजी, समुद्रतटीय खारभूमी, नापीक शेतजमिनीचे प्रश्न, रोजगार निर्मितीचा अभाव, सिंचन व्यवस्थेची अपुरी कामे, गणेशमूर्तिकारांचे प्रश्न, याबाबतीत गीते व तटकरेंना भंडावून सोडले जाईल.जोरदार तयारी सुरूपेण विधानसभा मतदार संघाचे चित्र पाहता येथील स्थानिक उमेदवार नसल्याने युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची तयारी जोरदारपणे सुरू आहे. पेणमधील ६४ ग्रा.पं., पाच जिल्हा परिषद मतदारसंघ यावर शेकापचे वर्चस्व आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaigadरायगडAnant Geeteअनंत गीतेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना