शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधून प्रतिबंधित वस्तूंची ‘जेएनपीए’मार्गे होतेय तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:03 IST

१२२ संशयास्पद  कंटेनर जप्त : सीमा शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : ‘जेएनसीए’च्या कस्टम सेंट्रल इंटेलिजन्स युनिटने बंदी घातलेले चिनी फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोचिप आणि इतर प्रतिबंधित पदार्थ असल्याच्या संशयावरून १२२ कंटेनर रोखून ठेवले आहेत. हे संशयित कंटेनर बनावट मालाच्या नावाने जेएनपीए बंदरात आणले असल्याचे सांगितले जात आहे.

उरण परिसरातील पंजाब कॉनवेअर गोदामात आलेल्या अनेक कंटेनरची तपासणी केली असता कस्टमला या कंटेनरची माहिती मिळाली होती. कर चुकवून बनावट मालाच्या नावाने व तस्करीच्या मार्गाने बंदी घातलेले चिनी फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोचिप आणि इतर प्रतिबंधित पदार्थ भरलेले हे सर्व संशयित १२२ कंटेनर एकाच जहाजातून जेएनपीए बंदरात आणले आहेत. 

सीसीटीव्हीच्या निगराणीत कंटेनर सीमाशुल्क विभागाने या कारवाईबाबत अद्यापही अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. अधिकाऱ्यांना या कंटेनरशी संबंधित गोपनीय माहिती मिळाली आहे. ज्याचा खुलासा करता येणार नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत १२२ संशयित कंटेनर सीसीटीव्ही व अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

तपासणीत काही कंटेनर साफ केल्याचे उघडn तपासणीत काही कंटेनर साफ केले गेले असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे सीआययूने  परिसरातील कंटेनर फ्रेट स्टेशन्स आणि कंटेनर टर्मिनल्सच्या सर्व व्यवस्थापकांना ई मेलद्वारे नोंदींची बिले, मूल्यांकन आणि कंटेनरची स्थिती यांसह कंटेनरचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. n रेड-लीड आणि लिथियमसारखी विषारी रसायने असलेल्या खराब गुणवत्तेच्या विदेशी फटाक्यांचा ओघ रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही  चीनमधून भारतात  प्रतिबंधित फटाक्यांच्या निषिद्ध मालाची तस्करी होत असल्याचा संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी