शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकांना दिलासा, नगरविकास मंत्र्यांकडे होणाऱ्या सुनावणीला उच्च न्यायालयाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 11:21 IST

Matheran News:

कर्जत : माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्याखाली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात ‘त्या’ सर्व नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सर्व नगरसेवकांना तात्पुरता दिलासा देत नगरविकास मंत्र्यांकडे होणाऱ्या सुनावणीला स्थगिती आदेश दिला.

माथेरान पालिकेच्या भाजपमध्ये गेलेल्या १० नगरसेवकांना २८ ऑक्टोबर रोजी पक्षांतर बंदी कायद्याखाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. तसेच निर्णयावर पुढील न्यायालयात अपील करण्यासाठी २१ दिवसांची मुदत होती. मात्र, सर्व नगरसेवकांना वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्टिफाईड कॉपी आवश्यक असते. ती कॉपी ९ नोव्हेंबर रोजी मिळाल्यामुळे १८ नोव्हेंबरपूर्वी वरच्या न्यायालयात अपील करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या सर्वांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध राज्याचा नगरविकास विभाग आणि मुंबई उच्च न्यायालयात २३ नोव्हेंबर रोजी अपील केले. याबाबत ३० नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने सर्टिफाईड कॉपी मिळण्यासाठी  झालेला उशीर यामुळे निर्धारित २१ दिवसांचा कालावधी ही बाब बाजूला ठेवत म्हणणे मांडण्याची संधी देत रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या २८  ऑक्टोबरच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. 

ही बाब न्यायालयाकडून मान्य राज्याच्या नगरविकास विभागाकडे दाखल केलेल्या अपिलावर १०  डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्या न्यायालयाने संबंधित १० नगरसेवकांबाबत काही निर्णय घेतल्यास त्या सर्वांना पुढील १५ दिवस हे वरच्या न्यायालयात अपील करण्यासाठी मिळायला हवेत आणि म्हणून १० डिसेंबरनंतरचे १५ दिवस ‘त्या’ सर्व १० नगरसेवकांच्या सदस्यपदाबद्दल रायगड जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या पक्षांतर बंदी कायद्यातील अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान