शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

शिधापत्रिकेबाबत नागरिकांत संभ्रम, गॅस जोडणीधारकांचे रेशन कार्ड रद्द होणार का?; सर्वसामान्यांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:24 IST

ration card News : शासनाने स्वस्त धान्य दुकादाराकडे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे.

- कांता हाबळेनेरळ : शासनाने स्वस्त धान्य दुकादाराकडे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास ही शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. या अटीमुळे शिधापत्रिकाधारक संभ्रमात असून, गॅस जोडणीधारकांची शिधापत्रिका रद्द होते की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त करत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी असून, बहुतांश जणांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणीही आहे, कर्जत तालुक्यातील बहुतांश आदिवासी भागातही गॅस जोडणी आहे, काही ठिकाणी तर आदिवासींना वन विभागाच्या वतीने मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत, याचा उल्लेख हमीपत्रात देणे क्रमप्राप्त असल्याने आमचे रेशन कार्ड रद्द होतो की काय, या संभ्रमात ग्रामीण भागातील कार्डधारक आहेत.         या नमुना अर्जात अर्जदार त्याच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांची माहिती भरल्यानंतर एक हमीपत्र दिले आहे. हमीपत्राच्या मजकुरात अर्जदार शपथेवर सांगतो की, माझे नावे, तसेच माझ्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावे गॅस जोडणी नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव करून देण्यात आली आहे, अशा प्रकारचा मजकूर या शिधापत्रिका तपासणी नमुना अर्जात देण्यात आला आहे.  

गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित?गॅस जोडणी काळाची गरज आहे, केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस जोडणी दिली आहे, असे असताना शासनाच्या नवीन धोरणानुसार, आता सर्वसामान्य गरिबांना शिधापत्रिका ठेवायची असेल, तर गॅस जोडणी रद्द करावी लागेल आणि गॅस जोडणी ठेवायची असेल, तर शिधापत्रिका रद्द करावी लागेल, त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकासमोर निर्माण झाला आहे. शिधापत्रिकाधारकाकडे गॅस कनेक्शन असेल, तर शिधापत्रिका रद्द होईल, असा उल्लेख सदरच्या नमुना अर्जात केला आहे. असा नियम लागू झाला, तर अनेकांच्या शिधापत्रिका रद्द होऊन गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित राहतील, अशी शक्यता आहे. शिधापत्रिका तपासणी मोहिमेंतर्गत कोणतेही गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित राहणार नाहीत, उज्ज्वला योजनेंतर्गत प्राप्त गॅस जोडणी दिलेल्या आदिवासींनाही नेहमीप्रमाणे धान्य मिळणार आहे. मात्र, सधन कुटुंबांचा या तपासणी मोहिमेत माहिती घेण्यात येत आहे.    - विक्रम देशमुख, तहसीलदार कर्जत शासनाने तालुक्यातील सर्वच रेशनकार्डधारकांना रेशन दुकानदारांकडून तपासणी मोहिमेंतर्गत नमुना फार्म भरून देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सर्वसामान्य गरीब लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आम्ही गॅस जोडणी असल्याने स्वस्त धान्यपासून वंचित राहणार की काय, अशी भीती वाटत आहे. प्रशासनाने या संदर्भात खुलासा करून लोकांचा संभ्रम दूर करावा.    - सदानंद म्हसे, सामजिक कार्यकर्ते

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र