शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पीक विम्यातील अटीचा अडसर, जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी नुकसानभरपाईपासून राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:54 IST

अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही.

आविष्कार देसाई अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही. याविरोधात सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विम्याची अट मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहेत.अर्थव्यवस्थेचा कणा असणाºया कृषी क्षेत्रातील शेतकºयांना दिलासा देण्याची तयारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने केली आहे. यासाठी त्यांनी सरकारच्याच निर्णयाचा आधार घेत निर्णय क्षमतेतील योग्य समय सूचकता त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांनी तयार केलेल्या अहवालामुळे बाधित शेतकºयांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जुलै ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारे झाले होते. त्यामुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक जिराईत पिकांना फटका बसला होता. आपत्तीमुळे १५ तालुक्यातील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते. त्यांचे क्षेत्र हे चार हजार ६४० हेक्टर एवढे होते. शेतीवर आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे होते. १६ हजार ९७ शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा काढलेला नाही. झालेल्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने सांगितले. त्यासाठी त्यांनी अहवालही तयार केला आहे, परंतु ही नुकसानभरपाई देताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाºया विम्याच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम असावी असा निकष अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी ग्राह्य धरावी, असा सरकारचाच निर्णय आहे.जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभच विमाधारक शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे योजनेचा निकष नुकसानभरपाई देण्यासाठी अडसर ठरत आहे.>योजनेचा लाभ शेतकºयांना मिळणार नाहीजिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये २०१६ साली ३० हजार २७४ शेतकरी समाविष्ट झाले होते. त्याचे क्षेत्र हे २२ हजार १६४.१७७ हेक्टर होते. त्यासाठी एक कोटी ७२ लाख ८७ हजार ७५४ प्रीमियम भरण्यात आला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले असल्यास तेथे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ तेथील शेतकºयांना मिळणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभही आता विमाधारक शेतकºयांना मिळणार नसल्याचे समोर आले आहे.>तीन कोटी ४८ लाखांची गरजअवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या १६ हजार ९७ शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी. यासाठी ढोबळ तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचा अहवाल तयार केला आहे. यासाठी त्यांनी २००९ च्या सरकारी निर्णयाचा आधार घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना तेवढा, तरी दिलासा देण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले.>२०१६मध्ये आपत्तीमुळे १५ तालुक्यांतील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते.कृषी विभागाने तयार केलेला प्रस्तावतालुका गावांची बाधित एकूण बाधित अपेक्षित निधीसंख्या शेतकरी क्षेत्र (हेक्टर) (रुपये लाखात)अलिबाग २२ १०६७ १५२.६७ ११.४५०पेण ५४ ९०३८ २६६०.५७ १९९.५४३मुरुड ०० ०० ०० ००खालापूर १५ १२१ ३९.६० २.९७०कर्जत ०६ २१ ८.९३ ०.६७०पनवेल ३३ ३१४० १०७८.२० ८०.८६५उरण ०० ०० ०० ००माणगाव १७ १२८ ६०.०३ ४.५२३तळा ०९ ३१ २२.३० १.६७३रोहे २९ १४७३ ३८५.६९ २८.९२७पाली ३४ ८३७ १९४.६८ १४.६०१महाड ०३ १० २.५८ ०.१९४पोलादपूर १४ ६३ ५.२४ ०.३९३म्हसळा ०४ ११२ १२.८७ ०.९६५श्रीवर्धन ०७ ५६ १७.३४ १.३०१एकूण २४७ १६,०९७ ४,६४०.९७ ३४८.०७३

टॅग्स :Farmerशेतकरी