शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

ग्रामपंचायत उमेदवारांना चिंता ऑनलाइन खर्च सादरीकरणाची, निवडणूक खर्च ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 00:26 IST

Gram Panchayat News : यावर्षी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक खर्च सादर करण्याच्या पद्धतीला छेद देऊन उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी ॲप तयार केले आहे.

- निखिल म्हात्रे अलिबाग : यावर्षी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक खर्च सादर करण्याच्या पद्धतीला छेद देऊन उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी ॲप तयार केले आहे. ही सेवा उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत असून, अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या उमेदवारांना होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी निवडणूक खर्च ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाईलमध्ये ऑनलाइन टू व्होटर ॲप डाऊनलोड करून त्यात खर्च सादर करावा लागत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे अँड्राॅईड मोबाईल नाही. तसेच आयोगाचे हे ॲप व्हर्जनच्या मोबाईलमध्येच डाऊनलोड होत आहे.प्रत्येक उमेदवाराला त्याच्या अँड्राॅईड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॅाल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे. तसेच ज्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केले, त्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. उमेदवारांपुढे प्रश्नचिन्हउमेदवार सातवी पास असला तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे अँड्राॅईड मोबाईल नाही. शिवाय त्यांना माहिती नसल्याने खर्च कसा सादर करायचा, या विवंचनेत उमेदवार आहेत. जिल्ह्याची परिस्थिती पाहता तालुक्यातील अनेक गावांत रेंज नसल्याने अडचणीचे ठरत आहे.खर्च सादर करण्यास मोबाईल रेंजचा अडसरपोलादपूर, श्रीवर्धन अशा दुर्गम भागात गेल्या काही वर्षांत मोबाईलचा वापर वाढला असला तरी टू जी आणि थ्री जी नेटवर्कही योग्य प्रकारे चालत नसल्याने समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक अडचणी आल्या होत्या. यामुळे आता निवडणूक खर्च कसा भरावा, याबाबत विजयी आणि पराभूत उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे. मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॅाल करण्यापूर्वी संबंधित उमेदवाराने ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. उमेदवारांपुढे अडचणी टू व्होटर ॲप एका मोबाईलवर इन्स्टॅाल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण केवळ एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीसाठी करण्याची व्यवस्था आहे. ऑनलाईन खर्च सादर करण्याची पद्धत म्हणजे त्रासग्रामपंचायत निवडणूक ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या वेळी झालेला खेळखंडोबा लक्षात घेऊन प्रशासनाला शहाणपणा सुचणे गरजेचे होते. मात्र, पुन्हा ऑनलाइन खर्च सादर करण्याची सक्ती म्हणजे प्रशासन मागच्या अनुभवावरून काही बोध घ्यायला तयार नाही हे निष्पन्न होते.- राकेश पाटील. ऑनलाइन खर्च सादर करण्याची पद्धत अवलंबणे हा प्रकार म्हणजे उमेदवारांना निव्वळ त्रास देण्याचा प्रकार आहे. ग्रामीण भागात नेटचा प्राॅब्लेम असणे; सर्व्हर डाऊन असणे असे प्रकार नेहमी होतात.- सुमित माने.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत