शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:06 IST

कांदळवनामुळे बाधित झालेल्या शेतजमिनींच्या बदल्यात पर्यायी जमीन देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

जयंत धुळप अलिबाग : समुद्रकिना-यावरील शेतीचे तसेच पिकांचे समुद्राच्या उधाणामुळे नुकसान झाल्यास शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याबाबत तसेच कांदळवनामुळे बाधित झालेल्या शेतजमिनींच्या बदल्यात पर्यायी जमीन देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास तत्वत: मान्यता दिली आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिल्या आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली.सध्या समुद्राचे उधाण या बाबीकरिता केवळ व्यक्ती मृत झाल्यास मदत देण्यात येते. समुद्राच्या उधाणामुळे पिकाचे किंवा शेतीक्षेत्राचे नुकसान झाल्यास तसेच जमीन खारपड झाल्यास नुकसानभरपाई देण्यात येत नाही. त्यानुषंगाने समुद्राचे उधाण या बाबीकरिता पिकाच्या नुकसानीसह सर्व नुकसानीकरिता राज्य शासनामार्फत मदत देण्यात यावी, तसेच ज्या ठिकाणी समुद्राच्या उधाणामुळे आणि कांदळवनामुळे शेती पूर्ण बाधित झाली आहे अशा जमिनींच्या बदल्यात पर्यायी जमीन देण्याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात यावा, असे खारभूमी विकास मंत्री रावते यांनी सांगितले. त्याची दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन विभागास दिल्या आहेत.खारभूमी विकास विभागांतर्गत समुद्र किनारा लाभलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५७५ खारभूमी विकास योजनाच्या माध्यमातून ४९ हजार १३३ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनांना किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना १९९१ (सीआरझेड) मधील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. ६४ खासगी खारभूमी योजनांना किनारा नियमन क्षेत्राच्या निर्बंधातून सूट नसल्याने या योजनांची कामे करण्यास शेतकºयांना अडचणी येत आहेत. समुद्राच्या उधाणामुळे खारभूमी योजनांच्या संरक्षित क्षेत्रात कांदळवनांची वाढ होऊन कृषियोग्य क्षेत्र शेतकºयांना लागवडीखाली आणता आले नाहीत. या प्रश्नाची दखल घेऊन खारभूमी विकास मंत्री रावते यांनी मंगळवारी हा प्रश्न उपस्थित केला होता.>हजारो एकर भात शेतीचे नुकसानखारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या तीस वर्षांत रायगड जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांची देखभाल व दुरुस्ती केली नसल्याने समुद्र संरक्षक बंधारे समुद्राच्या उधाणाने फुटून खारे पाणी भातशेतीत घुसून हजारो एकर क्षेत्रातील भात शेतीचे गेल्या तीस वर्षांपासून नुकसान झाले.मात्र या नुकसानीची नोंद खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, कृषी व महसूल विभाग यांनी संयुक्त सर्वेक्षण करून राज्य शासनास कळविणे आवश्यक होते. मात्र ते गेल्या तीस वर्षांत कळविण्यात आलेच नसल्याने रायगडमधील बाधित शेतकºयांना एकदाही नुकसानभरपाई मिळू शकली नसल्याची वास्तव परिस्थिती श्रमिक मुक्ती दलाचे राजेंद्र वाघ यांनी सांगितली.या संयुक्त सर्वेक्षणाबाबत रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून श्रमिक मुक्ती दलाने खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, कृषी व महसूल विभाग यांनी संयुक्त सर्वेक्षण करावे याकरिता अलीकडेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले होते.त्या वेळी पेण खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता दि.आ.भदाने यांनी दिलेल्या लेखीपत्रान्वये येत्या दहा दिवसांत या संयुक्त सर्वेक्षणाचे नियोजन होऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे.या सर्वेक्षणांती गेल्या तीस वर्षांपासून बाधित आणि सरकारी नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.