शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तापमान घसरल्याने हुडहुडी, रायगड जिल्ह्यात थंडीचा कडाका; महामार्गांवर धुक्याची चादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 10:50 IST

Cold : पहाटे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यासह नागोठणे शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरत असल्याने रस्ते अदृश्य झाले आहेत. निसर्गाची विविध रूपे नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत.

- अनिल पवार 

नागोठणे : मागील काही दिवसांत सर्वत्रच वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्याची चादर पसलेली दिसते. या दाट धुक्यामुळे नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पहाटे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यासह नागोठणे शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरत असल्याने रस्ते अदृश्य झाले आहेत. निसर्गाची विविध रूपे नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत.

रायगड जिल्ह्यात सर्वत्रच तसेच रोहा तालुक्यासह नागोठणे शहर व परिसरात पहाटेपासून ९ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरत आहे. दाट धुक्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक तसेच मॉर्निंग वाकला जाणाऱ्या लोकांना धुक्यामधून वाट शोधावी लागले. वातावरणातील हे बदलांमुळे खोकला, सर्दी व तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी थंडीमुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. 

सकाळी शेकोट्या, मॉर्निंग-वॉकवर भर कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. तर हुडहुडी भरविणाऱ्या या थंडीत सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील वाढले असून गरम कपडे, कानटोपी, मफलरची मागणी वाढली आहे. दरम्यान, गुलाबी थंडीत सायकलिंग करणाऱ्यांची संख्या देखील वाढली.

चालकांची कसरतआठ-नऊ वाजताही सगळीकडे अक्षरशः धुक्याची चादर पसरल्याचे दृश्य पाहायला मिळातो. या धुक्यामुळे वाहन चालकांना महामार्गावर वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे. मुंबई गोवा महामार्गांवर तसेच परिसरातील इतर राज्य मार्गांवर वाहनांनाही लाईट व इंडिकेटर चालू ठेवून संथगतीने जावे लागते. 

टॅग्स :Raigadरायगड