शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 05:58 IST

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत, हेच यातून स्पष्ट केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा दिसून आला असून, हरयाणातदेखील त्यांनी विरोधकांना धूळ चारली. त्यामुळे आम्ही फ्लाइट आणि फाइटसाठी तयार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर हवाई दलाच्या सी-२९५ एअर क्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-३० एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत, हेच यातून स्पष्ट केले आहे. 

‘दिबां’चा सन्मान करणार

आम्ही जे बोलतो ते करतो त्यानुसार स्थानिकांसाठी लढा देणारे नेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा सकारात्मकता दाखविली. मात्र, हे नाव नेमके कधी दिले जाणार, याबाबत बोलणे टाळले. 

‘विरोधक टीका करत राहिले’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार नाही, अशी टीका आमच्यावर विरोधक करत होते. मात्र, आम्ही विमानतळ पूर्ण करून आज रनवेवर विमानाची यशस्वी चाचणीदेखील केली. येथे दोन रनवे व चार टर्मिनल असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती मिळेल. 

अजित पवार गैरहजर

नवी मुंबई विमानतळाच्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. त्यांच्याऐवजी या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

‘मविकास आघाडीला भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार?’ 

तुम्ही कोविड मधल्या खिचडीत, डेडबॉडीच्या बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, चारा घोटाळ्यात, शेण घोटाळ्यात, कोळशात पैसे खाल्ले त्यामुळे तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी मविआला केला.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल