शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कोथुर्डे धरणगळती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:45 IST

महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.कोथुर्डे धरण हे रायगड परिसरात असून, गेल्या काही वर्षांत या धरणाला गळती लागली होती. रायगड विभागासह महाड नगरपालिका आणि दासगाव विभागातील २२ गावांची तहान भागविणारे कोथुर्डे हे एकमेव धरण आहे. गळतीमुळे एप्रिल महिन्यातच धरणाची पातळी घसरत असल्याने या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. लघू पाटबंधारे विभागाने ही गळती काढण्यासाठी १८.८० लाख रु पये खर्च केला. हे धरण पाणी सोडण्याच्या ठिकाणी आणि काही ठिकाणी मातीच्या भिंतीजवळ गळती लागली होती. यामुळे सेकंदाला १० ते १५ लिटर पाणी म्हणजे जवळपास ३० टक्के पाणी वाया जात होते.या धरणाची गळती थांबवण्यासाठी धरणाच्या मातीच्या भिंतीबाहेरून एक दगडी भिंत तयार करण्यात आली. वाळूची गाळणी (सँडफिल्टर) तयार करून त्यावर मातीचा थर टाकण्यात आला. या मातीत एक रासायनिक द्रव टाकण्यात आला. या प्रक्रि येमुळे या धरणाची गळती थांबली आहे. गळती रोखल्यामुळे पाणीसाठा कायम राहून गावांचा पाणीप्रश्न दूर झाला आहे. अद्याप तरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या धरणाची एकूण क्षमता ही २.७२ द.ल.घ.मी. आहे. महाड नगरपालिकेस या धरणातून १.११ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध होते. धरणाच्या गळतीमुळे ३० टक्के वाया जाणारे पाणी आता थांबले असून, या वर्षी धरणाच्या पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे गावांची पाणीसमस्या दूर झाली आहे.रायगड आणि दासगाव विभागातील कोकरे, आडीअंबार्ले, मांडले, मोहोप्रे, नांदगाव खु., नांदगाव बु., नाते, तळोशी, वहूर, वरंडोली, चापगाव, दासगाव, गांधारपाले, केंबुर्ली, खर्र्डी, किंजळोली बु., किंजळोली खु., लाडवली, वाळसुरे, करंजखोल, गोंडाळे आणि आचळोली या गावांच्या पाणी योजना या गांधारी नदीवरील याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कोथुर्डे धरणातून आॅक्टोबर ते एप्रिल या दरम्यान केवळ दोन ते तीन वेळा हे पाणी गांधारीच्या पात्रात सोडण्यात येते आणि धरणापासून १० कि.मी. ते १२ कि.मी. दूरवर गांधारीलगत असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या जॅकवेलने हा पाण्याचा पुरवठा होत असतो. नदीत सोडले जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे गावाच्या जॅकवेलना जोडले गेले तर वाया जाणारे पाणीदेखील वाचू शकणार आहे.तीन वर्षांचे यशस्वी प्रयत्नधरणाच्या गळतीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी अभ्यास करताना, स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त माहिती देखील विचारात घेण्यात आली. तीन वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न, सॅन्ड फिल्टर व आधुनिक गळती प्रतिबंधक प्रक्रिया याच्या मिलाफातून ही गळती आता कायमस्वरुपी थांबविण्यात अभियंत्यांना यश आले आहे.गेली तीन वर्षे नियोजनबद्ध काम करत धरणाची गळती १०० टक्के थांबवण्यात आली आहे, यामुळे अद्यापि पाण्याचा साठा आहे. नदीत सोडले जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. धरणातून पाइपलाइनद्वारे हे पाणी जॅकवेलना जोडले तर पाणीपुरवठा सुरळीत होऊन पाणीटंचाई समस्या राहणार नाही.- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,जलसंपदा पाटबंधारे विभाग