शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

चाइल्ड हेल्पलाइनला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: August 14, 2016 03:50 IST

लहान मुलांसाठी ‘चाईल्ड लाईन-१०९८’ ही आपत्कालीन फोन व सत्वर पोहोचणारी (आऊटरीच) सेवा २४ तास कार्यरत आहे. मुलांच्या समस्या सोडविण्याचे काम गतिमानतेने करणे

- जयंत धुळप,  अलिबागलहान मुलांसाठी ‘चाईल्ड लाईन-१०९८’ ही आपत्कालीन फोन व सत्वर पोहोचणारी (आऊटरीच) सेवा २४ तास कार्यरत आहे. मुलांच्या समस्या सोडविण्याचे काम गतिमानतेने करणे, मुलांसोबत सुरक्षित, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याकरीता ‘चाईल्ड लाईन -१०९८’ ही हेल्पलाईन जिल्हास्तरावर स्थानक करण्याचे आदेश सरकारने २००६ मध्येच दिले आहेत. मात्र रायगड जिल्ह्यात या समितीची अद्याप स्थापनाच झाली नसल्याचे उघडकीस आले आहे.जिल्ह्यात कर्जत आणि खालापूर या दोनच तालुक्यांत अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत बाल अत्याचार, बाललैंगिक अत्याचार व बालकांची पिळवणुकीचे तब्बल ५२ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रसिध्दी माध्यमात गाजलेले कर्जतमधील चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या अनाथालयातील ३२ मुलांवरील लैंगिक शोषण तर रसायनीतील एका खाजगी आश्रमातील ८ मुलांचे लैगिंक शोषणसारखे गंभीर गुन्हे जिल्ह्यात घडले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा बाल सल्लागार समिती सक्रीय कार्यरत करणे अनिवार्य आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा प्रशासन जागृकता दाखवत नसल्याचे सातत्याने पाठपुरावा करणारे रायगड चाईल्ड लाईनचे समन्वयक तथा कर्जत येथील दिशा केंद्र या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या पदसिद्ध अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असणे अनिवार्य आहे. चाईल्ड लाईन-१०९८ जिल्हा बाल सल्लागार समितीच्या स्थापनेबाबत चर्चोसाठी वेळ मिळावा, अशी विनंती करणारे लेखीपत्र दिशा केंद्र-रायगड चाईल्ड लाईनचे समन्वयक अशोक जगंले यांनी २ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना दिले.जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष पण प्रत्यक्षात समितीच नाहीजिल्हाधिकारी स्वत: पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या चाईल्ड लाईन-१०९८ जिल्हा बाल सल्लागार समितीचे उपाध्यक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक असतात तर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, बाएसएनएलचे महाव्यवस्थापक, सहाय्यक कामागार आयूक्त, जिल्हा शिक्षणाधीकारी (प्राथमिक), बालनिरिक्षण गृह प्रमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, एस.टी.विभागाचे परिवहन अधिकारी, रेल्वे स्थानक प्रबंधक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा चाईल्ड लाईन संचालक, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक हे या समितीचे सदस्य असतात.जिल्हा बाल सल्लागार समितीच्या स्थापनेबाबत चर्चेसाठी वेळ मिळावा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. मात्र गेल्या पाच महिन्यांत जिल्हाधिकारी यासाठी वेळ देऊ शकलेल्या नाहीत. त्यानंतर शुक्रवारी चाइल्ड लाइन जिल्हा समन्वयक अशोक जंगले, रायगड चाइल्ड लाइन समन्वयक अमोल जाधव यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आहे.जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी समिती स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रक्रीया पूर्ण करणे अपेक्षीत आहे. ती त्यांनी अद्याप केलेली नाही. जंगले यांच्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एस.गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना या बाबतची पूर्तता करुन मंगळवारी फाईल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. - किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन विभाग