शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिराचे श्रीशैल्य येथे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 20:13 IST

​​​​​​​श्रीशैल्य येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती ठिकाणी महाराजांचे मंदिर उभे केले आहे. संपूर्ण विश्वातील हे सर्वांत मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. 

अलिबाग - इ. स. १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी गेले असता श्रीशैल्य येथे आले होते. शिवाजी महाराज प्रखर शिवभक्त होते. त्यांना श्रीशैल्यम येथे अलौकीक अनुभूती आली. त्यावेळी आपले मस्तक मल्लिकार्जून ज्योतिर्लिंगावर आणि भ्रमरांबा देवीच्या शक्तीपीठावर वाहून त्याचा अभिषेक करायची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली.तेव्हा साक्षात भवानी माता तेथे प्रकट झाली आणि तिने त्यांना पुढील राष्ट्रकार्याची आठवण करून कृपाआशिर्वाद दिले. श्रीशैल्य येथे त्यावेळी महाराजांनी काही काळ वास्तव्य केले होते.मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग मंदिरासाठी मोठी देणगी दिली. मंदिराची सुयोग्य व्यवस्था लावून दिली आणि बराचसा भूभाग मंदिरासाठी जोडून दिला. त्यावेळी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार नव्याने बांधून काढले. आजही ते शिवाजी गोपूरम या नावाने ओळखले जाते.श्रीशैल्य येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती ठिकाणी महाराजांचे मंदिर उभे केले आहे. संपूर्ण विश्वातील हे सर्वांत मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. त्याच ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्यान मंदिराचे उद्घाटन दि१ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे अर्थ आणि वनमंत्री श्री. सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. रंगा हरी हे उपस्थित राहणार आहेत.राजस्थानातील लाल दगडातून घडविलेले आणि पुण्यातील धायरी येथील कलाकारांनी निर्मिलेले अत्यंत देखणे आणि भव्य असे हे ध्यान मंदिर आहे. अधिकाधिक शिवभक्तांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजी मेमोरिअल कमिटीने केले आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnewsबातम्या