शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

चेंढरे ग्रामपंचायतीची करवसुली झाली हायटेक, प्रत्येक घराबाहेर असणार क्यूआर कोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 05:49 IST

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

अलिबाग :

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम विकासावर होतो. हीच बाब लक्षात घेत  येथील चेंढरे ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. ‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’द्वारे हे काम पूर्ण होणार असून, पारदर्शकता येणार आहे. प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करून त्यांचे क्यूआर कोड  बनविण्यात आले आहे. पाणीपट्टी व घरपट्टीचे मापन त्याद्वारे कार्यान्वित करणारी  चेंढरे ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.  

सरपंच  स्वाती पाटील यांच्या हस्ते मंगळवारी अनौपचारिकपणे ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या,  ‘ग्रामपंचायत कर्मचारी पाणी आणि घरपट्टी घरोघरी जाऊन वसूल करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. अनेक वेळा वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागते. चेंढरे गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना अशी वसुली करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसेच शंभर टक्के करवसुली न झाल्याने गावाचा विकास साधता येत नाही. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘चेंढरे ग्रामपंचायत - अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’ सुरू झाली. यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर केला आहे.’   

यावेळी प्रियदर्शनी पाटील, मीनल माळी, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, सदस्य यतीन घरत, ममता मानकर, रोहन पाटील, ग्रामविकास अधिकारी नीलेश गावंड, ललित कदम, नीलेश सावर्डेकर, देवेश गवस, स्नेहल मोरे उपस्थित होते.

क्यूआर कोड असा होणार स्कॅनग्रामपंचायतीमार्फत घराच्या दरवाजासमोर घर क्रमांकाचा बिल्ला लावला जातो. त्यानुसार घर क्रमांकाची माहिती नागरिकांना मिळते; परंतु आता हा बिल्ला कालबाह्य होणार आहे. चेंढरे ग्रामपंचायतीने ‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’ सुरू केली आहे. या प्रणालीमार्फत कर वसुली करीत असताना प्रत्येक घरासमोर घर क्रमांकाच्या बिल्ल्याऐवजी क्यूआर कोडचे लेबल लावले जाणार आहे. यातून ग्रामपंचायत कर्मचारी क्यूआर कोड स्कॅन करून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करू शकतो. सर्व खातेदारांचा डेटा अचूकपणे अपडेट  ठेवला जाईल.